shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाल्याचे कॉंक्रीटीकरण अर्धवट राहिलेले काम पुर्ण करण्याबाबत मुख्याधिकारी काका साहेब डॊहीफोडे यांना रहिवाशांनी दिले निवेदन...!!


शिर्डी । प्रतिनिधी :

आज वार्ड नं. 11 मध्ये नाल्याचे कॉंक्रीटीकरण अर्धवट राहिलेले काम पुर्ण करण्याबाबत आज सर्व आंबेडकरनगर रहिवाशी , नाला रोड रहिवाशी उपस्थित असताना मुख्यधिकारी काका साहेब डॊहीफोडे साहेबांना निवेदन देण्यात आले,व त्या मध्ये आंबेडनगर रहिवास्यांच्या जाण्याचा व येण्याचा मार्ग असलेले पुल व आंबेडकर नगर मधुन कब्रस्तान  कडे जाण्याचा मार्गावर  नवीन पुल करणे तसेच आंबेडकर नगर मधील मंजुर असलेल्या रोड बाबत, व अनेक वर्षांपासून वडाचे झाड तोडण्या बाबत  व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर चौक करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

 त्या प्रसंगी सुरेश काळू आरणे, मा. नगरसेवक, कॉग्रेस उपाध्यक्ष शिर्डी, रवींद्र गोंदकर पा. शिर्डी, समीर शेख, कार्याध्यक्ष कॉग्रेस पार्टी, रमजान बेग , रमेश सोनवने, गणेश आढाव, अनिल आढाव, गुडू  शेख संघटक कॉग्रेस, योहान गायकवाड, चिटणीस कॉग्रेस पार्टी, सचिन आव्हाड , ञानेश्वर हातांगले, इसाख शहा, राजु  बागुल, रावसाहेब पठारे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यधिकारी यांनी त्वरित काम पुर्ण करून देतो असे सांगितले असुन त्वरित डायमंड काँन्ट्रॅक्टर यांना फोन करून लगेच काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्या बाबत त्यांचे मनापासुन आभार कार्यकर्त्यांनी आभार मानले.
close