प्रतिनिधी । संजय वायकर:
एमपीएससी उत्तीर्ण उमेदवाराची तोंडी मुलाखत झाली नाही, पोस्टींग रखडली गेली म्हणून आत्महत्या केली. म्हणे ,स्वप्नांचा चुराडा झाला.तरुणाने जीव गमावला. म्हणून आईने हंबरडा फोडला.या गोष्टी भावनेच्या भरात केल्या जात आहेत.एक तरुण तहसीलदार, बीडीओ ,पीएसआय बनला नाही म्हणून आत्महत्या करणे तर्काला,वास्तवाला अनुसरून नाही.
असे अनेक तरुण रीक्षा चालवतात,किराणा व दारूच्या दुकानावर काम करतात.बांधकामावर काम करतात,लॉरीवर भंगार गोळा करतात.ते का आत्महत्या करीत नाहीत?नोकरी आणि आत्महत्या, पैसा आणि आत्महत्या ,आरक्षण आणि आत्महत्या,पतीने सोडले म्हणून आत्महत्या, कर्ज फिटत नाही म्हणून आत्महत्या, मोबाईल पाहिजे म्हणून आत्महत्या, प्रेमसंबंध मान्य नाही म्हणून आत्महत्या यांचा संबंध संयुक्तिक नाही.ती मनाची असामान्य अवस्था आहे.मेंटल डिसऑर्डर आहे.स्फोटक दारू मोकळी उघड्यावर ठेवली तर स्फोट होत नाही. पण ती एअरटाईट ठिकाणी ठोसली तर स्फोट होतो.हेच तत्व बंदुकीची बुलेट,तोफ यामधे वापरले जाते.मी होईन तर तहसीलदार, बीडीओ फौजदार .नाहीतर आत्महत्या करणार.हे मेंदूत ठासून भरले कि त्याचा स्फोट होऊ शकतो.तसा स्फोट करणे संयुक्तिक नाही. तसे विचार मेंदूत ठासून भरल्याने गांधीजी, दाभोळकर, पानसरे यांचे खून झाले.
मुंबईत बॉम्बस्फोट झाले.कसाबकडून दुष्कृत्य झाले.जसे हे समर्थनिय नाही तसेच आत्महत्या समर्थनिय नाही. मग,ती तरूणाची असो ,शेतकरी ची असो कि महिलेची असो.कारण,प्राणाहून प्रिय नोकरी आहे का?प्राणाहून प्रिय पैसा आहे का?प्राणाहून प्रिय प्रेमी आहे का?मुळीच नाही. आणि कोणाला वाटत असेल तर त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास करावा लागेल.
शेतकऱ्याने आत्महत्या केली,अशी चिठ्ठी लिहून ठेवली.तरूणाने आत्महत्या केली,अशी पोस्ट शेयर केली.तरूणीने आत्महत्या केली ,असे पत्र लिहून ठेवले.अशा बातम्यांना आम्ही उत आणतो.तेल घालून प्रज्वलीत करतो.एकमेकांना भावनिक आव्हान घालतो. मला वाटते,असे करतांना आम्ही आमच्या बुद्धीची आत्महत्या करतो. असामान्य विचार,असामान्य कृती करणे सखोल अभ्यासले गेले पाहिजे.
महाराष्ट्र सरकारने एमपीएससी परीक्षा लांबवली.अभ्यासासाठी शहरात राहाण्याचा खर्च परवडत नाही. उधार पैसे फिटत नाहीत. नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही. ही समस्या खरी आहे.त्यासाठी सरकारचा विरोध केला पाहिजे.सरकारवर नियंत्रण कसे राहिल,?सरकार ठिकाणावर कसे येईल ?यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते न करता आत्महत्या करणे सर्वस्वी चुकीचे आहे.
एमपीएससी सिलेक्ट उमेदवार पुढे तहसीलदार, बीडीओ, फौजदार वगैरें पदावर नियुक्त होणार.अशी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांची या आत्महत्याबाबत काय भूमिका आहे?कि मेला तर मरू द्या,आपले स्वाहा चालू ठेवा बकासुरासारखे.हे आधिकारी तर या सरकार च्या चुकीच्या धोरणांचे वहन करीत आहेत.समर्थन करीत आहेत.एक तरूण मेला याचे कोणाही अधिकाऱ्याला सोयरसुतक नाही. या निर्ढावलेल्या,सरावलेल्या, बकासुरी अधिकाऱ्यांना ना खेद ना खंत.यांच्याच पंक्तीत तो तरूण जेवायला बसणार होता.माझ्या जळगाव जिल्ह्यातील एकही एमपीएससी आधिकारी मला प्रामाणिक सापडला नाही.
पुरूष नव्हे, महिला आधिकारी सुद्धा सुद्धा. हे मी प्रत्यक्ष अनुभवातून बोलतो,लिहीतो.या भ्रष्ट आधिकाऱ्यांच्या चक्रव्यूहात मी अनेकदा अभिमन्यू बनून शिरलो आहे.त्यांच्या अंगी कोणतेही गावाचे,जातीचे,देशाचे,धर्माचे इमान आढळले नाही. त्या श्रेणीत आत्महत्या करणारा तरूण जावू ईच्छीत होता.पण ढिसाळ शासन व्यवस्थेने त्याला थोपवून ठेवले.म्हणून त्याने आत्महत्या केली.ती ईश्वराला आवडली नाही.ती मानवाला आवडली नाही.
आत्महत्याचे समर्थन करणे,सहानुभूती दाखवणे,प्रसिद्धी देणे,उदात्तीकरण करणे योग्य नाही. तसे करतांना आम्ही आमच्या बुद्धीची आत्महत्या करून घेतो.
एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन. पण तिचे स्वरूप बदलून महाराष्ट्र पब्लिक शोषण कमीशन बनलेले आहे. एमपीएससी उत्तीर्ण आणि पदावर पोस्टींग झालेलें सर्रास अपहार करतात,लांच घेतात .यावरून असे दिसते कि,उमेदवारांची चरित्र गुणवत्ता तपासणी व अभ्यासक्रम हा भ्रष्टाचार व अपहार करण्यासाठीच शिकवला जात असावा.एमपीएससी उत्तीर्ण आधिकाऱ्याची गैझटेड ऑफिसर्स असोसिएशन आहे.त्यांनी या आत्महत्या घटनेवर भाष्य केले नाही. लांच घेतांना आधिकारी पकडले गेले, त्यांचाही कधीच निषेध केला नाही.ही स्थिती काय दर्शवते? सरकारी आधिकाऱ्यांचा संघटितपणे अपहार व भ्रष्टाचार करण्याचे धोरण.हे धोरण बदलण्याचे नैतिक बळ पवार व ठाकरे यांच्यात आहे का?हे चाचपून पाहण्याची वेळ आली आहे. कि त्यांनीही आपल्या नितीमत्तेची आत्महत्या केली?याची माहिती घेणे आवश्यक आहे.
तात्पर्य, दैहिक आत्महत्या एकाची होते.आम्ही हळहळतो.पण सरकारची नैतिक आत्महत्या झाल्याबद्दल आम्ही खेद खंत बाळगत नाहीत.
हमारा जवान लडका तो मर गया.मगर हमारा जमीर जिंदा है या मुर्दा?
शिवराम पाटील
जळगाव.

