प्रतिनिधी । संजय वायकर:
कांग्रेस या पक्षाशी लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी,पंडित नेहरू ही नावे अतूट चिकटलेली आहेत.कांग्रेस म्हटले कि हिच विभुती डोळ्यासमोर येतात. अशा विभुतींचा पक्ष आज धूळखात पडला आहे.जाग आली तर स्वप्नरंजन करून वेळ मारून नेत आहेत. पण वास्तवाचे भान विसरलेले आहेत.
टिळक,गांधीजी, नेहरूंची कांग्रेस म्हणजे त्यागाची,लढाई ची,चारित्र्याची कांग्रेस. या विभुती उच्चशीक्षीत आणि धनवंत असूनही जमीनीवर राहिलीत.जनतेच्या गर्दीत मिसळली.ते लोकांचे झाले. म्हणून लोक त्यांचे झाले. म्हणून कांग्रेस बहरली.इतकी कि,१९७८पर्यंत त्यांच्या स्पर्धेत कोणताही पक्ष उभा राहू शकला नाही. आणि आज कांग्रेस कोणत्याही पक्षाच्या समोर उभी राहू शकत नाही. आता फक्त केजरीवाल, पवार,बैनर्जी यांचे गुनगान गाऊन समाधान मानावे लागते.शेजारी पाळणा हलला तर लोरी म्हणायला जावे लागते.
महाराष्ट्रात सतत सत्तेत राहाणारी कांग्रेस आज चौथ्या स्थानावर आहे.शिवसेना आहे राष्ट्रवादी यांच्या सोयीनुसार पाठिंबा देत आहे.हे परावलंबित्व कांग्रेस ला का खटकत नाही?याची उत्तरे शोधली पाहिजे.
उपरोक्त उत्तर शोधण्यासाठी मी माझी टिम घेऊन प्रदेश अध्यक्ष मा.अशोकराव चव्हाण, मा.बाळासाहेब थोरात, ,मा.नाना पटोले यांचेपर्यंत धडक मारली.कोणताही माडूची मदत न घेता.तसा प्रयत्न केला असता तर भेट मिळालीच नसती.म्हणून चव्हाण आणि पटोले यांना सरळ जाऊन भेटलो. त्यांना माझ्या जळगाव जिल्ह्यातील निष्क्रिय नेत्यांबाबत इतिहास, भुगोल, नागरिक शास्र सांगितले. त्यांना पटलेही.पण काही कारणे हतबलता दाखवली.राखेने मारलेल्या लक्ष्मणरेषा ते ओलांडू शकले नाहीत.आणि इकडे तर आख्खा मराठी जनसमुदाय जिंकून सह्याद्री ओलांडून मुंबईत सत्ता स्थापन करायची जबाबदारी दिलेली आहे.म्हणून नाना पटोलेंना मी सरळ सरळ सांगितले कि मी तुम्हाला समोर पाहिले, भेटलो,बोललो.मी ओळखले.कि या माणसात दम आहे.तसाच मी तुमच्या समोर ठाम उभा आहे.
तुम्ही मला ओळखले पाहिजे. निर्णय घेतले पाहिजे. माणसाला भेटण्याची,भेटीत ओळखण्याची,पारखण्याची कला नेत्यामधे पाहिजे. ओळखले तर निर्णय घेण्याची क्षमता, धाडस पाहिजे. प्रेमात आणि युद्धात प्रत्येक प्रसंग अवचित धावून येतात.तेंव्हा पुस्तक उघडून वाचायची संधी मिळत नाही. तेंव्हा आपल्याच बुद्धीने,कौशल्याने निर्णय घ्यावे लागतात.तोच खरा योध्दा. नाहीतर,थांबा मी आईला विचारून सांगतो. असे म्हणून चालत नाही. तोपर्यंत घटना विपरीत मोड घेऊन निघून जातात.
चव्हाण साहेब, पटोले साहेब तरी भेटले. तितके धाडस दाखवले.पण संगमनेर चे थोरात तर पळ काढत सुटले.का?त्यांना जळगाव हून संदेश गेला होता कि हा माणूस तुम्हाला तेथेच बोबडे करेल.म्हणून आमची ठरलेली भेट झाली नाही. आता ते बाळासाहेब कांग्रेस कडून महसूलमंत्री आहेत.महसूल खाते हेच खाते जिल्हा प्रशासन चालवते.बाळासाहेबांकडून काय अपेक्षा ठेवणार?कसा पक्ष वाढणार?महसूलमंत्री बदलला पाहिजे. नितीन राऊत,विजय वडेट्टीवार सेहरा बांधून तयार आहेत.
मा.नाना पटोलेसाहेब कांग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आलेत.नवीन रोपटी लावण्याऐवजी जुने खोडांना पाणी घालून गेले.म्हणे या खोडांना कोंब फुटले कि जळगाव जिल्ह्यात कांग्रेस हिरवीगार होईल.कापलेल्या, खुरडलेल्या,किडलेल्या खोडांना पालवी फुटली तर पटोलेसाहेबांचा दौरा फलित होईल.
...शिवराम पाटील.
9270963122..
जळगाव जिल्हा जागृत जनमंच

