shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाईनमनला जिवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल..!!

महावितरणच्या संघटना तर्फे हल्याचा तिव्र निषेध...

---------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
घरावरील लाईटचा आकडा का काढला म्हणून  युसुफ वडगाव येथे कार्यरत असलेल्या लाईनमनला मोबाईल वरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे कार्यरत असलेले लाईनमन गणेश इंगळे यांनी दि. ५ जुलै रोजी गावातील दत्तात्रय सौंदने यांनी वीज चोरी करण्यासाठी विद्युत तारेवर आकडा टाकून घेतलेला विद्युत पुरवठा करणारा आकडा काढून टाकला. म्हणून त्याचा राग येऊन दत्तात्रय सौंदने यांनी दि. ६ जुलै रोजी मोबाईल फोन वरून लाईनमन गणेश इंगळे यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

लाईनमन गणेश इंगळे यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दत्तात्रय सौंदने यांच्या विरुद्ध भा. दं. वि. ५०७ प्रमाणे अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                         
वरील हल्याचा महावितरणच्या केज तालुक्यातील सर्व संघटनांनी निषेध नोंदवुन आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
close