----------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरातील मटका जोमात सुरू आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी केज पोलीस कधी कारवाई करतात.काल आसीच कारवाई केज पोलीस कडून करण्यात आली आहे.
केज येथे मटका बुक्कीवर धाड टाकून दोघांवर बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर पोलीसांनी कार्यवाही केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.७ जुलै रोजी दुपारी ३:३० वा. च्या दरम्यान केज शहरात मंगळवार पेठ मध्ये पांचाळ नावाचे हॉटेल समोर सार्वजनिक ठिकाणी बालासाहेब लिंबाजी डोईफोडे हा लोकांना जादा पैशाचे अमिष दाखवुन आकडयावर पैसे लावुन कल्याण मटका नावाचा जुगार लोकांना जादा पैशाचे अमिष दाखवुन खेळत व खेळवित आहे.
अशी माहिती पोलिसांना मिळाल्या वरुन पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळकृष्ण मुंडे, पोलीस नाईक मंगेश भोले व वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत गायकवाड यांनी त्या ठिकाणी अचानक छापा मारला. तेथे बालासाहेब लिंबाजी डोईफोडे वय ४२ वर्ष रा. कासारी ता. केज याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे जुगाराचे साहीत्य व रोख रुपये २८५० रु. आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता; त्याने सदरचा मटका हा बुकी मालक सुशील संतराम सत्वधर रा.केज यांचे सांगण्यावरुन १० टक्के कमिशनवर घेतो व त्यालाच देतो असे कळविले आहे.
या वरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादी वरून बालासाहेब लिंबाजी डोईफोडे रा.कासारी ता. केज व मटका बुकी मालक सुशील संतराम सत्वधर रा. केज यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) प्रमाणे सरकार तर्फे गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आली आहे.

