shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी कृषी विद्यापीठास कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी मिळणार भरीव निधी...!!

राहुरी । तालुका प्रतिनिधी:
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे  कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार  या क्षेत्रामध्ये कार्य फार मोठे आहे. या विद्यापीठास कृषी तंत्रज्ञान पार्कसाठी भरीव निधी  देण्यासाठी सर्व प्रयत्न करु, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ  यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह साजरा झाला. या पार्श्वभूमीवर काल पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते वृक्षारोपन करुन वनमहोत्सव सप्ताहाचा सांगता  समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ना. मुश्रीफ बोलत होते.


पद्मश्री पोपटराव पवार  यांनी बिगरगाभा पाणलोट क्षेत्र विकासासाठी विद्यापीठाच्या पाणलोटक्षेत्र विकास प्रकल्पाला रु. 28 लाखाच्या निधीचे (Fund) पत्र कुलगुरुंना सुपूर्त केले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आदर्शगाव योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील  यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले , पोलीस अधीक्षक मनोज पाटील , उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, डॉ. महानंद माने, विजय कोते, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते.
     
   *➡️दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार) राहुरी तालुका प्रतिनिधी*
close