shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर निमगावकेतकी काटी परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी.

इंदापूर निमगावकेतकी काटी परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी.
इंदापूर: जून महिना ओलांडूनही पाऊस न पडल्याने ढगांकडे डोळे लावून अतुरतेने वाट पाहणारा शेतकरी त्याच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दि. ७ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता इंदापूर ,निमगावकेतकी ,काटी, वडापुरी, बावडा परिसरात विजांच्या कडकडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुधवार दि. ७ रोजी दिवसभर कडाक्याचे ऊन पडले असताना उकाड्याने नागरिक हैराण झाले होते या स्थितीतच अचानक इंदापूर परिसरात  मेघगर्जना करीत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली या पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे. आजही इंदापूर तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे शेतकऱ्याच्या चर्चेतून व्यक्त होत आहे.
 दि. ७ जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील पावसाची आकडेवारीची नोंद अशी आहे की, इंदापूर ३९.० मि मी, निमगाव केतकी २०.० मि मी,  काटी २७.० मि मी,लोणी देवकर०१.०  मि मी, सणसर ०२.० मि मी, अंथूर्ने०६.०    मि मी. बावडा ०५.०मि मी.
close