shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरकारच्या निष्क्रीयते मुळे स्पर्धा परिक्षार्थींचे मनोबल खचले आहे...! जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावरून झाला आत्महत्येचा प्रयत्न ..!!

यावेळी पोलिस प्रशासनाने वाचवले जरूर .. पण
भविष्यात योग्य विचार नाही झाला तर मंत्रालयावरून उड्या मारू - एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांचा इशारा..करमाळा सध्या पुणे.        

पुणे । प्रतिनिधी:- महेश घरबुडे आणि शर्मिला येवले हे स्पर्धा परीक्षार्थी विध्यार्थी आहेत. गेले पाच वर्ष पुण्यात राहून अभ्यास करत आहेत, तीन दिवसां पूर्वी स्वप्नील लोणकर या त्यांच्या मित्राने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर हा या सरकारच्या ढिसाळ कारभाराचा बळी गेला . याचा निषेध म्हणून मंगळवारी  महेश शर्मिला आणी काही विद्यार्थी गणिमा कावा करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले  तेथे कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जाऊन घोषणाबाजी  करत उडी मारण्याच्या तयारीत  असताना पोलिसांनी वेळीच अडवले. 

यावेळी पोलिसांची मोठ्या प्रमाणात पळापळ झाली. अचानक विद्यार्थ्यानी केलेल्या आंदोलनामुळे प्रशासन अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली...!

घोषणाबाजी केल्यामुळे अख्खे कार्यालय दुमदुमुन गेले. आपले सरकार अस्तित्वात आल्यापासून एमपीएससी द्वारे शासकीय नोकरी मिळविणे स्पर्धा परीक्षार्थींना दिवास्वप्नच बनून राहिले आहे. मागील दोन वर्षांपासून आपल्या सरकारने फक्त एकच राज्यसेवेची परीक्षा घेतली आहे. करोना, मराठा आरक्षण, तर कधी शासकीय खर्चात कपात असे कारण देऊन विविध शासन आदेश काढत सगळ्या भरती प्रक्रिया मंद करून टाकल्या आहेत. महापरीक्षा पोर्टल बंद करून आपण परत त्याच प्रकारच्या भ्रष्ट आयटी कंपन्यांना गट-क आणि गट-ड च्या परीक्षा देऊन विद्यार्थांचा भ्रमनिरास केला आहे. 

करोना मूळे आधीच हवालदिल असलेला विद्यार्थी आपल्या या सर्व निर्णयामुळे हा नैराश्यात गेला आहे, यामुळेच महाराष्ट्रात कितीतरी स्पर्धा 
परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्रालयावरून उड्या मारू असा इशारा यावेळी महेश घरबूडे यांनी दिला. 

स्पर्धा परीक्षार्थींच्या मागण्या:-
१)एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.
२) एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
३) विविध परीक्षेत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या देण्यात  येऊन प्रलंबित मुलाखती घेण्यात याव्या.
४) सरळसेवा परीक्षा खासगी आयटी कंपन्या मार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घेण्यात यावी.


गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचे मुलं-मुली आपल्या कडे खूप आशेने या मागण्या करत आहे. आपल्याला विनंती आहे की या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या. आशी मागणी शर्मिला ऐवले या विद्यार्थिनीने केली. यावेळी करमाळा तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील आणी उभ्या महाराष्ट्रातून आलेले अनेक विद्यार्थी या आंदोलनात सामिल होते. वेळेत पोलिस पोहचले नसते तर आज आणखी एका विद्यार्थ्याचा बळी गेला असता, सुरक्षा जाळी लावल्यामुळे शर्मिला येवले ही विद्यार्थीनी वाचली.
close