अहमदनगर:- बदलते हवामान ,जिवनशैली यांमुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. अचानकपणे होणाऱ्या दुर्घटना ,रस्ते अपघात कोरोनासारखे भिषण नवनवीन विषाणूजन्य आजार यामुळे समाजाचे आयुष्यमानच धोक्यात आले आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी आपली शासकीय आरोग्य यंत्रणा तितकीशी बळकट नाही त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयांच्या बाबतीत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत.
आजारी पडल्यावर प्रत्येक सर्वसामान्य नागरीकाला वाटते की आपल्याला चांगल्या नावाजलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार मिळायला हवेत तर बरेचदा शासकीय रुग्णालयांत उपचार उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागतात. महागडे वैद्यकीय शिक्षण तसेच महागडे वैद्यकीय उपकरणे तसेच खाजगी रुग्णालयांच्या उपचार शुक्लावर शासनाचे नसलेले नियंत्रण यामुळे खाजगी रुग्णालयांतील उपचारांसाठी सर्वसामान्य नागरिकांना कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे. अनेकदा आपघातात इजा झाल्याने रुग्णांना लाखोंची बिले भरण्यासाठी जमीन ,घरं विकून कर्जबाजारी झाल्याच मी पाहीलं आहे. उपचारांचे योग्य पर्याय उपलब्ध नसल्याने किंवा माहीतीच्या अभावामुळे ही वेळ रुग्ण व नातेवाईकांवर अनेकदा येते.
रुग्ण हिताच्या शासकीय योजना उपलब्ध आहेत परंतु ठराविक रुग्णालयात ठरवीक उपचार उपलब्ध असल्याने ते रुग्णांसाठी गैरसोयीचे ठरते.अचानक येणाऱ्या आजारपणासाठी खाजगी रुग्णालयांची महागडी बिलं भरण्यासाठी आपली बचत संपवून कर्जबाजारी होण्यापेक्षा आरोग्यविम्याचा पर्याय निवडून अचानक येणाऱ्या आजारपणामुळे रुग्णालयात येणाऱ्या उपचार खर्चाची चिंता सोडून निर्धास्त व्हा.
शासकीय योजनांविषयी माहिती जाणून घ्या. निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घ्या. आरोग्यदायी सवयी जोपासा. आपल्या जिवनातील आर्थिक समतोल रुग्णालयाच्या खर्चामुळे ढासळू न देण्यासाठी योग्य त्या आरोग्यविम्याचा पर्याय निवडा. योग्य तो आरोग्यविमा नक्कीच घ्या. आरोग्य विमा काळाची गरजंच आहे.
आरोग्य उपचारांसाठीच्या शासकीय योजनांविषयीच्या माहितीसाठी ,आरोग्यविमा योजनांसाठी संपर्क करा.
७३५०६३३६७५/९२८४७८७०२३
मा. योगिराज गो. धामणे.
जनआरोग्य फाऊंडेशन.
आरोग्य विमा सल्लागार.

