प्रतिनिधी l मोहन शेगर- सोनई
शनिशिंगणापुर-राहुरी एन.एच.160 सी. या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या साडेतीन वर्षापासुन रखडले आहे. अत्यंत चालढकल पद्धतीने सुरु असलेल्या काम मुदत संपुनही हा मार्ग पुर्णत्वास गेला नाही. हा माहामार्ग पुर्ण होण्यास किती वर्ष लागतील देव जाणे अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
22 कि.मि. रस्ता कामासाठी तब्बल 111 कोटीचे टेंडर काढले. भाविकांची होणारी गैरसोय दुर व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्गत समावेश करण्यात गेला परंतू हा रस्ता निकृष्ठ पद्धतीने केल्याने नावालाच राष्टीय महामार्ग म्हटले जात आहे. दरम्याण या रस्त्यावरील राहुरीपासुन-छोटे-मोठे पुल सिमेंट काँके्रटने बनविले.
मात्र सोनई येथिल कौतुकी नदीवर काँक्रीटचा पुल बनविण्याऐवजी ठेकेदाराने सिमेंट पाईप टाकुन बनविला गेला होता. अनेक तक्रारींच्या नंतर शेवटी पाईप काढुन काँके्रटचा पुल बनवण्याची नामुष्की ठेकेदारावर ओढावली यासर्व रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शनिशिंगणापुर-राहुरी राष्ट्रीय महामार्गाला ठेकेदाराची साडेसाती लागल्याने भाविकांसह नागरीकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. देवस्थानला जोडणार्या नगर मनमाड हायवे वरील राहुरी ते शनिशिंगणापुर तसेच शनिशिंगणापुर मंदिर ते नगर-संभाजीनगर हायवे अशा दोन्ही हायवेंना जोडणारा एन.एच.160 सी. हा रस्ता रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी भाविकांची गैरसोय लक्षात घेता राष्ट्रीय महामार्गात समावेश केला. त्याकामासाठी 111 कोटीचे टेंडर साडेतीन वर्षापुवी मंजुर केले. काम पुर्ण करण्यास दोन वर्षाचा कलावधी निश्चित केला.
मात्र ठेकेदाराने सुरुवातील अत्यंत वेगात काम सुरु केले. मात्र नंतर रस्ता कामात मोठा गैरव्यवहार करुन निकृष्ठ दर्जाचे काम सुरु केले. त्यातच महामार्गालगतच्या नागरीकांनी कामाचा दर्जा आणि लाभधारकांनी जमिनीचा मोबदलासाठी न्यायालयात दादा मागितली. त्यामुळे काम चालु-बंद अवस्थेत सुरु असुन ठेकेदाराने या रस्त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
महामार्गावर अर्धवट पुले व अर्धवटरस्त्यावमुळे अनेक अपघात घडले आहे. रस्त्याची लांबी स्थानिक पुढार्यांच्या दबावापोटी कमी अधिक प्रमाणात करत असल्याने मोठे वाद उत्पन्न झाले आहेत. त्यातच वंजारवाडी-सोनई या भागातील रोड लगतचे व्यवसाइकांचे अतिक्रमणे हटविले आहे. मात्र वर्षाहुन अधिक काळा लोटला असल्याने रस्ताच पुर्ण केला गेला नाही.
त्यामुळे व्यवसायीकांची रोजी-रोजी ठेकेदाराने हिरावुन घेतली. ठेकेदाराच्या मनमान कारभार व निकृष्टपद्धतीने होत असलेला माहमार्गाच्या कामात सार्वजानिक बांधकाम खात्याचे अधिकार्यांशी साटेलोटे ठेकेदाराने बांधले असल्याने या स्त्याकडे एकही अधिकारी फिरकत नाही. मुदतीत काम न करण्यार्या ठेकेदारावर मंत्र्याची मेर नजर आहे का? असा सवाल उपस्तिथ होत आहे.
शनिमंदिर पासुन संभाजीनगर हायवेला जोडणारा पाच कि.लो.मि. रस्त्याला ठेकेदाराने अजुन हात लावला नसुन हेही काम सुरु झाले नाही. दोन्ही महामार्गावरुन येणार्या भाविकांची गौरसोय दुर होण्याऐवजी आणखी गैरसोय निर्माण झाल्याने हा रस्ता पुर्ण होण्यासाठी अजुन किती वर्ष वाट पहावी लागणार ही शंका उपस्थित होत आहे.
मंत्री नितीन गडकरींना ग्रामपंचायतचे साकडे
शनिशिंगणापुर राहुरी या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट झाले असल्यामुळे ठेकेदाराची चौकशी करुन कारवाई करावी या मागणीचे पत्र वंजारवाडी येथिल ग्रामंपचायतीने दिले असुन कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. रस्त्याचे कॉके्रटीकरण फुटत आहे. त्याजागेवर ठेकेदाराने डांबर ओतले आहे. सदरचा रस्ता 100 फुटही प्लेन सरफेस नाही. त्यामुळे अनेक जिवघेणे अपघात झाले आहे. सदर कामांमध्ये वापारण्यात आलेले मटिरीयल निकृष्ट दर्जााचे वापरले असुन संबधित बांधकाम अधिकार्यांनी दुर्लक्ष केले आहे. रस्त्याच्या कामाची 3 पार्टीकडुन चौकशी व्हावी अशा आशाचे पत्र मंत्री नितीन गडकरी यांना देऊन या बाबात एक प्रकारे साकडे घातले आहे.
काँके्रटीकरणावंर डांबराचे पॅच शनिशिंगणापुर-राहुरी महामार्ग हा भाविकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व गैरसोय दुर करणारा माहामार्ग ठरला हेाता. मात्र कामाच्या दर्जा बाबात शंका उपस्थित झाल्या असतांनाही मुदतीत काम पुर्ण झाले नाही शिवाय अर्धवट रस्ता फुटल्याने ठेकेदाराने या कॉके्रटीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डांबराचे पॅच लाऊन रस्त्यावरील खड्डे बुजवले त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता डांबराने झाकण्याचा प्रयन्न झाल्याने या रस्त्याबाबात शंका उपस्थित झाल्याने ठेकेदारावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

