shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानव विकास परिषदीच्या जिल्हा अध्यक्ष पदी-आप्पा साहेब निमसे यांची नियुक्ती.!!



प्रतिनिधी । मोहन शेगर:
सोनई--महाराष्ट्र राज्य प्रणित मानव विकास परिषदेच्या अध्यक्ष पदी परिचित असलेले आप्पा साहेब सखाराम निमसे यांची नगर जिल्हा अध्यक्ष पदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

        
तशा आशयाचे नियुक्ती पत्र संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बळवंत मनवर यांच्या स्वाक्षरी ने निमसे यांना प्राप्त झाले आहे.
       
या मानव विकास परिषदेच्या माध्यमातून समाजातील नागरिकांवर होणारा अन्याय,शोषित,श्रमिक,पोलीस कोठडीतील मृत्यू, बेकायदेशीर अटक,अत्याचार, गुलामगिरी, दहशत, सरकारी कार्यलयाकडून होणारी पिळवणूक, मानवी हक्क उल्लंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवल शाहीकडून पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर अश्या या न्याय हक्कासाठी आवाज उठवून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने या मध्ये तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष आप्पासाहेब निमसे यांनी केले आहे.
     
या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व बांधकाम समितीचे अध्यक्ष सुनील गडाख,सोनई सेवा संस्थेचे चेअरमन ह.भ.प.विश्वासराव गडाख, मुळा कारखान्याचे माजी संचालक राजाभाऊ कुसळकर, आदींनी अभिनंदन केले आहे.
close