shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा असाअसेल अहमदनगर दौरा..!!



महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तसेच राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचा शुक्रवार, दिनांक २३ जुलै, २०२१ रोजीचा जिल्हा दौरा कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे राहील-
 

सकाळी ८:१५ वा. निवासस्थान राहुरी येथून शासकीय वाहनाने महत्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरीकडे प्रयाण. स. ८-३० वाजता महत्मा फुले कृषी विदयापीठ येथे आगमन आणि वरवंडी ग्रामस्थांसोबतच्या बैठकीस उपस्थिती. सकाळी. ९ .०० वाजता कृषी विदयापीठ येथून शासकीय वाहनाने अहमदनगरकडे प्रयाण. सकाळी ९-४५ वाजता जिल्हा परिषद, अहमदनगर येथे    आगमन व मा. जिल्हा परिषद अध्यक्षा आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती. (स्थळ- जिल्हा परिषद अध्यक्षांचे दालन). सकाळी १०-३० वाजता अहमदनगर येथून शासकीय वाहनाने वावरथ, ता. राहुरी कडे प्रयाण. स. ११-३० वाजता वावरथ येथे आगमन आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत खावटी अनुदान योजनेतील लाभार्थी (वावरथ, जांभळी, जांभुळबन)

यांना अन्नधान्य, किराणा वाटप समारंभास उपस्थिती. दुपारी १-३० वाजता वावरथ येथून शासकीय वाहनाने अकोले, जि. अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी ३-३० वाजता अकोले येथे आगमन आणि डॉ. किरण लहामटे व महावितरण अधिकारी यांच्या समवेत बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५-३० वाजता अकोले येथून शासकीय वाहनाने राहुरीकडे प्रयाण. रात्री ७ वाजता निवासस्थान राहुरी येथे आगमन व राखीव‌ राहील  असा असेल दैरा.                   

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600
close