राहुरी: राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द मधील कोरोना योद्धा पुरस्कार आदरणीय धामोरी गावचे कामगार पोलीस पाटील खंडु जाधव यांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्राजक्त दादा तनपुरे, रामगिरी महाराज यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला
याप्रसंगी सत्कार करण्यात आला याप्रसंगी धामोरी गावचे ग्राम विकास अधिकारी वाघ मॅडम व कामगार तलाठी राहणे मॅडम व आरोग्य खात्याच्या मुजावर मॅडम व प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय सोनवणे बाबासाहेब सोनवणे तसेच रजनीकांत जाधव विद्यमान सरपंच सुनिता ताई पवार डॉक्टर हरिष्चंद्रे पत्रकार रावसाहेब वर्पे समीर सय्यद समाजसेवक नितीन कदम व संभाजी उगले गावडे इत्यादी व गावातील आदिवासी समाज बांधव यांनी पोलीस पाटील खंडु जाधव यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी आदिवासी समाजाच्या चेहऱ्यावर पाहण्या लाईक आनंद दिसून येत होता यावेळी पोलीस पाटील यांनी कोरोणा काळात चांगले काम केले
या समाज बांधवांना पाहून पोलीस पाटील यांना अनावर झाले व गावातील नागरिकांना पाहून या कोरोना युद्धाच्या पुरस्काराने त्यांना अनावर झाले येथून पुढच्या काळात सुद्धा मी जनतेची अहोरात्र सेवा करीन असे जाधव यांनी सांगितले तसेच वृक्षारोपण करण्यात आले धामोरी खुर्द मधील गावातील लोकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

