विनया मेढेकर । पनवेल :-
पनवेल । दि.२१: कोरोना विषाणूची तिसरी लाट पाहता पनवेल महानगरपालिकेस रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून ३ हजार व्हिटीएम आर.टी.पी.सी.आर किट देण्यात आले. यावेळी सिप्ला कंपनीचे साईट प्रमुख विजय थानगे, सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ.पुनम जाधव, सिप्ला फाऊंडेशन सीएसआर मॅनेजर सुनिल मकरे उपस्थित होते.
देशात कोरोना विषाणूची तिसरीत लाट लवकरच येणार असल्याचे भाकीत वैज्ञानिकांनी वर्तविले आहे. कोरोना साथरोगामध्ये नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे का नाही ? याचे निदान करण्यासाठी ॲन्टीजन आणि आरटीपीसीआर चाचणी महत्त्वाची असते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याची गरज आहे. सध्या महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त श्रीगणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्यांच्या किटची गरज भासत असून सिप्ला कंपनीच्यावतीने देण्यात आलेले आरटीपीसीआर किट महापालिकेस कोरोना चाचण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहेत.
आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व वैद्यकिय अधिकारी डॉ. पूनम जाधव यांच्या प्रयत्नानी कोरोनाच्या या महामारीमध्ये सिप्ला कंपनी महापालिकेस विविध प्रकारची वैद्यकिय मदत करत आहे. याआधीही ॲन्टीजन आणि आर.टी.पी.सीआर. किट दिले होते. यापुढेही वैद्यकिय मदत करण्याचे आश्वासन यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.

