shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पंचायत समितीचे कार्य उल्लेखनीय - हर्षवर्धन पाटील*

*इंदापूर पंचायत समितीचे कार्य उल्लेखनीय - हर्षवर्धन पाटील*
आयएसओ'चे मानांकन मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन*
  *'
इंदापूर प्रतिनिधी-
  इंदापूर पंचायत समितीने केलेल्या कार्याची दखल घेऊन यशवंतराज पंचायत अभियानाअंतर्गत समितीने इंदापूर पंचायत समितीस इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनचे (आयएसओ) मानांकन दिल्याने राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सभापती, उपसभापती, सर्व पंचायत समितीचे सदस्य तसेच गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
   "यशवंतराज पंचायत अभियानाअंतर्गत इंदापूर पंचायत समितीने सरकारच्या महत्त्वाच्या उपक्रमात केलेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे इंदापूर पंचायत समिती या मानांकनास पात्र ठरली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पंचायत समितीने उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केले आहे.पंचायत समितीचे सभापती स्वाती शेंडे, उपसभापती संजय देहाडे,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सर्व पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी केलेल्या सहकार्याने हे यश संपादन करता आले.
      इंदापूर पंचायत समितीने उल्लेखनिय कार्य केले असून  नागरिकांच्या सेवेसाठी अधिकाधिक योजना राबवाव्यात असे प्रतिपादन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
close