----------------------------------------
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील देवगाव येथील विवाहितेला मुलबाळ होत नाही आणि चारित्र्यावर संशय घेत तिचा सासरी छळ केला म्हणून नवरा, सासू सासऱ्यांसह सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील देवगाव येथील श्रीदेवी केशव नागरगोजे हिचे पाच वर्षांपूर्वी केशव नागरगोजे यांच्या सोबत झालेले आहे.
तिला मुलबाळ होत नसल्याच्या, चारित्र्याच्या संशयावरून तसेच घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला तसेच तिला सासरी जाच जुलूम करुन जिवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिले या प्रकरणी पीडित विवाहिता श्रीदेवी केशव नागरगोजे हिच्या फीर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा केशव महादेव नागरगोजे, सासु सत्यभामा महादेव नागरगोजे, सासरा महादेव भानुदास नागरगोजे, दिर अरूण महादेव नागरगोजे, जाऊ सोनाली अरूण नागरगोजे, लहान दिर विनोद महादेव नागरगोजे सर्व रा. देवगाव केज यांच्या विरुद्ध गु.र.न. ३६४/२०२१ भा.दं.वि. ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर नखाते हे करीत आहेत.

