(तात्काळ रस्ते द्या अन्यथा वीस गावांचा मतदानावर बहिष्कार)
("स्वाभिमानी"गनीमी कावा पद्धतीने बीड -लातूर ,अंबाजोगाई -कळंब राज्य महामार्ग रोखणार --कुलदीप करपे)
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
तालुक्यातील होळ,बनसारोळा,युसूफवडगाव गटातील बहुतांशी रस्ते रहदारी सारखे राहिलेले नाहीत.वारंवार मागणी निवेदन करूनही उपयोग झाला नाही.रस्त्यांच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब- अंबाजोगाई राज्य महामार्गावर बोरीसावरगाव येथे मंगळवारी रोजी एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.तहसीलदार डी सी मेंडके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन कांबळे, जि .प.बांधकाम उपविभाग केज अभियंता श्री बी. ई.खेडकर, आदींच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आक्रमक,घोषणाबाजी शासन,प्रशासन मुर्दाबाद,अकार्यक्षम लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध, रस्ते द्या,मतदानावर बहिष्कार आंदोलकानी घोषणाबाजी केली.
--------------------------
पोलिस प्रशासनाचे सहकार्य
आंदोलना दरम्यान आंदोलनाला कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले तर युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सपोनि. श्री. विजय आटोळे सह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले
-----------------
लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब
होळ ,युसूवडगाव ,बनसारोळा जिल्हा परिषद सर्कलमध्ये लोकप्रतिनिधी केवळ नावाला आहेत पुन्हा गावाकडे फिरकत नाहीत त्यांच्या नावाने केवळ बोंबा मारण्याची वेळ येते असे आंदोलक घोषणाबाजी करत होते
--------------------
चंदनसावरगाव-जवळबन, जवळबन-बोरीसावरगाव,
सावळेश्वर-जवळबन,
डिघोळआंबा-कानडी बदन, बनसारोळा- सौंदाणा,
बनसारोळा-आवसगाव,
सावळेश्वर-आवसगाव,
नायगाव-आवसगाव,
बनसारोळा-इस्थळ,
लाडेगाव-औरंगपूर,
लाडेगाव-दिपेवडगाव
लाडेगाव-जवळबन
कानडीबदन-सोमनाथबोरगा
पैठण-वाकडी
आनंदगाव-सारणी
आनंदगाव-भाटुंबा
आनंदगाव-सोनिजवळा
आनंदगाव-पाथरा
लोखंडी सावरगाव-बोरीसावरगाव* (अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्ग)
हे रस्ते गेली 10 वर्षांपासून प्रचंड मोठे खड्डे पडुन खराब झाले असल्याने नागरिकांना ,आबालवृद्धांना दैनंदिन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. यातील काही रस्ते कागदोपत्री केल्याचे दाखवून बोगस बिले उचलली आहेत संबधित गुत्तेदार,अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी
सदर रस्ते तात्काळ नव्याने मंजूर करावेत, काही रस्ते दुरुस्ती करावेत या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ,लहू गायकवाड , सुग्रीव करपे शिवाजी शिंपले,बंडोपंत कुलकर्णी ,हनुमंत साने,अशोक साखरे,लक्ष्मण काकडे ,अविनाश धायगुडे,इस्थळ दत्ता शिंदे,गोविंद शिनगारे,सरपंच गणेश राऊत,अशोक भोगजकर,चंद्रकांत अंबाड, दत्ता साखरे, मनोहर करपे,नवनाथ काकडे, रमेश गोरेमाळी ,सुनील शिनगारे,श्रीकिशन साखरे, महेश गायकवाड, प्रवीण खोडसे ,मंगेश शिंदे,
सरपंच शिवाजी शिंपले,
संदिप करपे,दिगंबर,श्रीधर भाकरे ,दत्ता साखरे, बालासाहेब करडकर, सुंदरराव साखरे, प्रवीण करपे,अविनाश करपे, दयानंद करपे, परसराम करपे, सुनील जोगदंड,अमोल करपे,विकास करपे, शिवाजी भाकरे,संदीप भाकरे, बाबा करपे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
15 ऑगस्ट पर्यंत नवीन रस्ते व दुरुस्ती न झाल्यास प्रत्येक गावात ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी यावेळी दिली अनेक वेळा निवेदन देऊनही दखल घेत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले होते 16 ऑगस्ट पासून गनिमी कावा आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सांगितले.

