shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेबांची नगर शहरात नव्याने सुरु होणाऱ्या "जाऊ द्या ना राव" या कॉमेडी शोच्या सेटवर सदिच्छा भेट

अहमदनगर । प्रतिनिधी:
 अहमदनगरचे नाव सिने आणि नाट्य सृष्टीत नेहमीच अग्रेसर असते .. नट श्रेष्ठ स्व. शाहू मोडक , स्व. मधुकर तोरडमल , स्व. सदाशिवजी अमरापूरकर, आणि उत्कृष्ट बालगंधर्वकालीन नेपथ्यकार स्व. पेंटर श्रीगोंदेकर यांच्या सारख्या अनेक दिग्गज कलावंतांमुळे आपल्या नगरचे नाव संपूर्ण देशभरात गाजले . 

आजही असेच नगरच्या मातीतील सुपुत्रांनी "जाऊ द्या ना राव" ह्या नवीन कॉमेडी शोची संकल्पना मांडली व  एक भव्य सेट उभारून ती सत्यात उतरवली . लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेबांना ह्या कॉमेडी शोबद्दल माहिती कळताच त्यांनी स्वतः त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळातून वेळ काढून "जाऊ द्या ना रावच्या" सेटवर जाऊन सदिच्छा भेट दिली आणि डोळ्यांचे पारणे फिटेल असा भव्य सेट पाहून संपूर्ण "जाऊ द्या ना रावच्या" टीमचे भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.

 त्यावेळेला उपस्थित असलेल्या "जाऊ द्या ना रावच्या" कलाकारांचे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. सुभाष गुणाजी श्रीगोंदेकर यांनीही कौतुक करून आशिर्वाद दिले. सुभाष श्रीगोंदेकर यांनी आमदार साहेबांबद्दल केलेल्या भाषणामुळे प्रेरित होऊन आमदार निलेशजी लंके साहेबानी सुभाष श्रीगोंदेकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. लवकरच हा कार्यक्रम माय फिल्म्स स्टुडिओ या यु ट्यूब चॅनेल ला दर शनिवार रविवारी प्रदर्शित केला जाईल ...
close