shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे शहरात बोपदेव घाटात प्रेयसीसोबत बसलेल्या तरुणाला प्रेयसीच्या भावाकडून कोयत्याने मारहाण..!!



पुणे:-बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे प्रेयसीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला प्रेयसीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली असून तिघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुण हा बिबवेवाडी परिसरातील राहणारा आहे. बुधवारी सायंकाळी तो आपल्या प्रेयसीसह बोपदेव घाटातील टेबल पॉईंट याठिकाणी गप्पा मारत बसला होता. यावेळी त्या ठिकाणी आलेला प्रेयसीचा भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. 

तर अन्याय एकाने कोयत्याने डाव्या हाताच्या अंगठ्या जवळ खांद्याला आणि मांडीवर वार करून गंभीर जखमी केले.

फिर्यादी तरूणाने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत
close