shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळशीतील सातव मर्डर केस मधील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद..!!


पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाची सिल्लोड औरंगाबाद येथे जाऊन कारवाई...

पुणे:-दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये दसऱ्याच्या दिवशी मुळशीतील लवळे येथे प्रतीक सातव याची पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली होती. गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी सुरज राजाराम सुतार वय ३० वर्ष राहणार सुतारवाडी पाषाण हा फरार होता. 

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ अभिनव देशमुख यांनी सदर आरोपी मिळून येत नसल्याने त्याचा शोध घेणेकामी दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीण पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व पथकाने माहिती काढून सदर आरोपीस सिल्लोड औरंगाबाद येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले आहे व पुढील कारवाईसाठी पौड पोलीस स्टेशन यांना सुपूर्द केले आहे.
 
सुरज सुतार हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे.

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ पौड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर,महेंद्र कोरवी मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पथकाने केली सायबर पोलिस स्टेशनचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी कारवाईसाठी तांत्रिक मदत केली.
close