विनया मेढेकर । पनवेल :-
२४ जुलै २०२१ । पनवेल मधिल अल्पवयीन मुलीस तीच्या राहत्या घरातुन पळवून नेल्याची घटना उघडकीस आल्याने पनवेल मध्ये खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा महिला सुरक्षित बाबत प्रश्नन निर्माण झाला आहे. खादेश्वर पोलिसांनी पीडित मुलीला कनकवली येथून सुखरूप आणून पालकाच्या ताब्यात दिले आहे.
आरोपी राहुल विष्णू सावंत, राहणार देवगड याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पीडिताच्या वडिलाच्या तक्रारीवरून खादेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पीडीत हि अल्पवयीन असल्याचा आरोपीनी फायदा घेवून तीला फुस लावून २१ जुलै रोजी कनकवली येथे पळवून नेली व तीच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
खादेश्वर पोलीस पथकाला याची तपासा दरम्यान माहिती मिळाल्याने पोलीस उप निरीक्षक करचे, पो.हवालदार सांरग, पो. हवालदार शेलार, पो. महिला शिपाई कोटकर हे कनकवली येथे २३ जुलै रोजी जावून आरोपीस बेड्या ठोकल्या. मुलीला तिच्या पालकाच्या ताब्यात देन्यात आले असून तीच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच मेडिकल व तीच्या जबाबातुन निष्पन्न झाले आहे.
याबाबत मिळालेले वृत्त असे की, पिडीत मुलगी ही पनवेल इथली रहिवाशी असून 21जुलै रोजी आरोपि ह्याने तीला फुस लावून कनकवली येथे पळुन नेवून तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर शिवीगाळ व मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांच तक्रारीवरून खादेश्वर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली असून दि.24 जुलै रोजी पनवेल सत्र न्यायालयात हजर केले असून सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल थळकर यानी बाजु मांडली. आरोपीस 30 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावन्यात आली आहे. सदर गुन्हाचा तपास पोलिस उपनिरीक्षक करचे करीत आहे.

