shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीला आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी साई मंदिर उघडणे हाच पर्याय - अनिताताई जगताप..!!

शिर्डी शहर प्रतिनिधी : 
श्री साईबाबांच्या माहिती प्रमाणे देश,  विदेशातील लाखो करोडो साईभक्तांची श्री साईबाबांचे मंदिर उघडून समाधीचे दर्शनासाठी आर्त विनवणी आज विविध माध्यमातून रोज ऐकिवात येत असतें.


साईभक्त बाबांच्या दर्शनासाठी श्री साईबाबा संस्थानला सोशल मीडिया, मेल, पोस्टाच्या माध्यमातून मंदिर उघडण्याची विनंती करतांना दिसत आहे. काल गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त देशभरातून श्री साईबाबांचे मुख व समाधी मंदिराच्या कळस दर्शनासाठी चार ते पाच हजार भक्त शिर्डीत आले होते. यावेळी वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देतांना भक्तांना बाबांच्या दर्शनाविना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचे चित्र टीव्ही माध्यमातून संपूर्ण जगाणे पहिले आहे. कोरोना महामारीचे संकट संपूर्ण देशभर पसरल्याने मागील एक दीड वर्षांपासून साईबाबा मंदिर बंद असल्याने साईभक्त बाबांच्या दर्शना पासून वंचित आहे. यामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांची संख्या हीं मोठ्याप्रमाणात रोडावली आहे. 

साईभक्त हां शिर्डीच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने मागील वर्ष दोन वर्षांपासून साईभक्तविना शिर्डीची अर्थव्यवस्थाही प्रचंडप्रमाणात कोलमडली आहे. देश, विदेशातील साईभक्त शिर्डीत येत असल्याने येथील हॉटेल, रेस्टॉरंट, हार फुल, फोटो मूर्ती दुकानें, रिक्षा, टुरिस्ट वाहन व्यवसाय, किराणा, शेतमाल किंवा शेकडो हातावर पोट भरणारे यापैकी अन्य मध्यम व लघु उद्योग तसेच शिर्डी परिसरातील चाळीसगावांचे नोकरदार, शेतकऱ्यांचे अर्थकारणहीं शिर्डी व साईमंदिरावर अवलंबून आहे. 

परंतू कोरोनाच्या संकटामुळे आजमितीला हें सर्व व्यवसाय चाळीसगाव परिसर पूर्णपणे ठप्प आहे. या सर्वांची उपासमारीची भयंकर वेळ आज ओढवली आहे. शिर्डीच्या आर्थिक रथाचे चाक रुतल्याने देशभरातील राष्ट्रीय, सहकारी बँक, पतसंस्थाही मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकिंग क्षेत्रही भयंकर संकटात सापडल्याने त्यांनाही कर्जाऊ मालमत्ता जप्तीच्या नोटीस नाईलाजास्तव व्यावसायिकांना द्याव्या लागत आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये भीती व रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मागील काही महिन्यांपासून शहरात आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेकांनी आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवली आहे. हें यावेळी मोठ्या खेदाने सांगावेसे वाटते. अशी प्रतिक्रिया प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा, तथा नगरसेविका सौं. अनिताताई जगताप यांनी दिली. यावेळी पुढे बोलतांना सौं. जगताप म्हणाल्या कीं महामारीच्या संकटावर उपाय म्हणून श्री साईबाबा मंदिर कोरोनाच्या सर्व नियमावली अंमलात आणून त्वरित उघडणे, ज्या प्रमाणे देशभरातील धार्मिक तीर्थस्थळे, तिरुपती बालाजी, काशी विश्वनाथ व उज्जेनचे महाकालेश्वर मंदिर सामान्य भक्तांसाठी उघडले गेले त्याच धर्तीवर शिरडीच्या साई मंदिराला हीं उघडावे. 

साईमंदिरात जाताना प्रत्येक साईभक्तास व शिर्डीकर नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावा,  दैनंदिन भक्तांची संख्याही तीन ते चार हजाराच्या आसपास ठेवावी, यामुळे येणाऱ्या भक्तांना शिर्डीत मुक्कामाची व्यवस्थाही प्रशासनाला करता येईल व शहराच्या अर्थव्यवस्थेला हीं चालना मिळण्यास एकप्रकारे मदतच होईल. राज्यावर आलेल्या महामारीच्या भयंकर संकटातही महाराष्ट्राला सुरक्षित ठेऊन मुख्यमंत्री मा. उद्धवजीं ठाकरे साहेब यांनी आपल्या सयंमी कामाची चुणूक दाखवून दिली आहे तसेच ते शिर्डी व साईबाबा मंदिराबाबत सकारात्मक निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. 

यासाठी एक शिवसैनिक म्हणून मी, आमच्या महिला आघाडी कार्यकर्त्या व स्थानिक शिवसैनिकांना बरोबर घेऊन मुंबई मा. मुख्यमंत्र्यांची समक्ष भेट घेऊन मंदिर व शिर्डीच्या समस्ये बाबत त्यांना कल्पना देऊ तसेच शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिला गृहिणी, युवतींनी व नागरिकांनीहीं गृहउद्योग स्थानिक व्यवसाया निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, शिर्डीला नविन व्यावसायिक नगरी म्हणून नावारूपाला आणण्याचा संकल्प करावा व शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक साईभक्तास आदर सेवाभावाची वागणूक देण्याची भूमिका प्रत्येक शिर्डीकरांनी मनी ठेवावी अशी अपेक्षाही शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा व शिर्डी नागरपंचायकतीच्या नगरसेविका, माजी नगराध्यक्षा सौं. अनिताताई जगताप यांनी व्यक्त केली.
close