shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राखी कर्तव्याची!!!!एक राखी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन मैत्री सेवा फाउंडेशन‌ एरंडोल..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
9960595807

प्रतीनिधी - एरंडोल येथील मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे राखी कर्तव्याची.एक राखी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
             

आपल्याला भारत मातेचे शौर्य धैर्य व विजयाचा झेंडा सीमेवर फडकवणाऱ्या जवानांच्या प्रति बहिण-भावाचे नाते  जोपासणारा  सण रक्षाबंधन पर जवानांसाठी राखी कर्तव्याची या संकलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या संकलनात एरंडोल शहरा मधील बहिणी-स्त्रियांनी जवानां प्रति शुभेच्छा पत्र-लेखन किंवा ग्रीटिंग, चित्र,कविता, इत्यादी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

पत्रावर आपले नाव,गांव,पत्ता,मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे तसेच लेखन केलेले पत्र व जवानांसाठी  राखी पॉकेट मध्ये  पॅक करून तयार करून त्यावर पण आपली माहिती नाव,पत्ता लिहून  समर्थ कोल्ड्रिंक्स महात्मा फुले पुतळ्याजवळ,एरंडोल,मो.8087847378,
9673868883,श्री.स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स माळीवाडा कॉर्नरएरंडोल.
मो.7588053195,9421706661,अंबिका मेडिकल,जयहिंद चौक गांधीपुरा एरंडोल.मो.9096239684,9420140756 याठिकाणी दिनांक :-२५/०७/२१ ते २९/०७/२१ पर्यंत.वेळ :-सकाळी ०९:०० ते संध्याकाळी ६:०० वाजे पर्यत  जमा करावे तसेच आपण लिहलेले पत्र हिंदी मध्ये असावे.

आपण लिहिलेल्या पत्राचे फोटो मैत्री सेवा फाउंडेशनच्या पेजला टॅग करा त्यातील निवडक फोटो प्रसिद्ध केले जाणार आहेत.सदर फोटो Instagram ID :-
m.s.foundation.erandol
Facebook ID :- मैत्री सेवा फाउंडेशन एरंडोल वर टाकावे असे आवाहन करण्यात आले आहे.
close