shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन यांची कृषी राज्य मंत्र्यांकडे मागणी..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
9960595807

प्रतिनिधी - एरंडोल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय महाजन यांनी कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम यांना एरंडोल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था व गांधी पुरा विविध कार्यकारी सहकारी संस्थे मधील १५० शेतकरी महात्मा फुले कृषी कर्ज मुक्ती योजने अंतर्गत यादीत नाव समाविष्ट असुन देखील अजुनही वंचित असुन कृषी अवजार योजनेचा एरंडोल धरणगाव तालुक्याला इष्टांक वाढवून द्यावा अशी मागणी केली आहे.
       
एरंडोल तालुक्यात सदर योजने अंतर्गत २ ट्रॅक्टर देण्यात आले आहे.ही संख्या मर्यादित असल्यामुळे अनेक शेतकरी या योजने पासुन वंचित आहे.एरंडोल व धरणगाव तालुक्याला या योजने अंतर्गत ट्रॅक्टर वाढवून देण्यात यावा अशी लेखी मागणी केली आहे.
close