shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रमोद काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण..!!

शिर्डी प्रतिनिधी | दि. २१ ( तुषार महाजन )
शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक व अध्यक्ष, युवा नेते प्रमोद काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीन फाऊंडेशन संस्थापक व अध्यक्ष अमित जगताप यांच्यातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

आजच्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन व  सामाजिक बांधिलकी जपत तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय लोणी काळभोर कोळपे वस्ती वन विभाग परिसरामध्ये प्रमोद काळभोर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे समाजाने हे लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने वृक्षाची लागवड ही आपल्या लेकरा प्रमाणे करावी. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 


यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील असे अमित जगताप म्हणाले. यावेळी शिवशाही प्रतिष्ठान, ग्रीन फाऊंडेशन, धनगर समाज सेवा संस्था, जनाई शिक्षण संस्था, विभा गिरिश ट्रस्ट, लोणी काळभोर ग्रामस्थ उपस्थित होते.
close