shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली..!!


प्रमोद चौधरी । जिल्हा प्रतिनिधी:

आज, बुधवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे घरगुती गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या आमदारांनी विधानसभेतही गैरवर्तन केले. या सर्व बाबींचा निषेध म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरत आहे. बुधवारी शिवसेना धरणगांव चौफूल्ली वर रास्तारोको आंदोलन केले.







यावेळी डॉ.हर्षल माने म्हणाले की, एक वर्षा साठी बारा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, कासोदा चे सरपंच महेश पांडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख
महानंद ताई पाटील, रवींद्र चौधरी, नगरसेवक कुणाल महाजन, पंचायत समिती चे अनिल महाजन, चिंतामण पाटील, रविन्द्र जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काही क्षणा साठी महामार्ग वर वाहनांचे रांगा लागल्या होत्या
close