ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले...
नगर प्रतिनिधी:-(शिवा म्हस्के) : अहमदनगर जिल्हा मधील पाथर्डी तालुक्यात दि.06/07/2021 रोजी उपकेंद्र करंजी या ठिकाणी कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी. डाॅ. गणेश गोवर्धन शेळके यांनी प्रशासनाच्या हेतुपस्पर जाणुन बुजुन दिल्या जाणाऱ्या जाचास कंटाळून कर्तव्यर असतानाच फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटवरू असे निर्देशनास येते कि, वरिष्ठ अधिकारी हे जाणून बुजून त्यांना सतत लक्ष करत असे.अशा प्रकारची खंत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होती. संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, यांच्या निदर्शनास आणून दिली होते.पंरतु त्यामध्ये सुधारणा करण्याऐवजी त्यांना सुज्ञ करून मानसिक दृश्य तणावामध्ये राहण्यास परावृत्त केले. यातुनच डाॅ. गणेश शेळके यांनी दि.06/07/20201 रोजी दुपारी
1.वाजता आत्महत्या केली.
निवेदनाच्या प्रति मा.प्रधानमंत्री भारत सरका,मुख्यमंत्री महाराष्ट्र,आरोग्यमंत्री, पोलिस महासंचालक,विरोधी पक्षनेते,संचालक, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर असे अनेक ठिकाणी हे निवेदन प्रत करण्यात आल्या आहेत.



