अहमदनगर: सोमवार दि.१२ जुलै २०२१ रोजी ‘मलाला दिवसाच्या’ निमित्ताने स्नेहालय संस्थेने ऑनलाइन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक जॉयस कॉनोली आणि संगीता सानप यांनी दिली.
दरवर्षी बालिकांच्या शैक्षणिक समानता या विषयी प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन स्नेहालय संस्थेतर्फे केले जाते.यावर्षी देखील एक अनोखा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वाना आमंत्रित करीत आहोत.
सह कुटुंब अथवा एकट्याने या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेता येईल. या स्पर्धेत स्नेहालायातील बालके त्यांच्या काही आवडत्या आणि लोकप्रिय चित्रपटांमधील गाणी सादर करतील ज्यावरून स्पर्धकांना विचारलेल्या प्रश्नंची उत्तरे द्यायची आहेत. या कोव्हीड काळात स्नेहालायातील बालके तसेच सर्वांसाठी अतिशय उत्तम करमणुक यानिमित्ताने स्नेहालय परिवार घेऊन येत आहे.
सोमवार दिनांक १२ जुलै रोजी संध्याकाळी 7.30 वाजता या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. आपण ‘झूम मिटींग्स’ च्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
त्यासाठी लिंक :https://us02web.zoom.us/j/85817813305?pwd=dTFIR0xsQVRzRHljY3NMYUd4UDYxUT09
भाग्यवान विजेत्यांना आमच्या नवोदित कलाकारांनी तयार केलेली काही उत्कृष्ट कलाकृती भेट दिल्या जातील.
-----------------------------------------------------------
आपली विश्वासू,
डॉ.प्रिती भोंबे
९९७०९८२५०५
------------------------------------------------------------


