shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईनाथ पवार यांच्या प्रयत्नाने दिव्यांगासाठी विशेष लसीकरण मोहीम संपन्न..!!


राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-
दिव्यांगांना लसीकरण करून घेण्यास खूप अडचणी येत होत्या बऱ्याच वेळा लस न घेताच घरी परतावे लागत होते. त्यामुळे दिव्यांगा बांधवांना शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत होता म्हणून  अपंग कर्मचारी संघटना व तहसील कार्यालय अलिबाग यांच्या सहकार्याने 6जुलै 2021 रोजी अलिबाग तालुक्यात सकाळ सत्रात मांडवा व दुपार सत्रात अलिबाग अशा दोन ठिकाणी दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली सदर लसीकरण मोहिमेत सुमारे 400 दिव्यांगाचे लसीकरण करण्यात आले.
        
सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी दिव्यांग कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष साईनाथ पवार अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ व त्यांचा  कर्मचारी वर्ग , संतोष माने , बि.जि पाटील , पत्रकार राजेश बाष्टे इत्यादी नी खूप  मेहनत घेतली
close