बागलांच्या ताकदीवर मी नगराध्यक्ष झालो नाही, तर जगताप गटाच्या ताकदीवर आपल्या जागा वाढल्या... नगराध्यक्ष वैभवराजे जगताप..!!
प्रतिनिधी : संजय वायकर
करमाळा : (दि .९) : १९९६ पासुन करमाळा नगर परिषद जगताप गटाच्या नेतृत्वाखाली आहे,अल्ताफ तांबोळी साहेब आपण फक्त दोन टर्म नगरसेवक झालात, मग कुवत कोणाची जास्त आहे?याला पंचांग बघायची गरज नाही. बागल गटाची एवढीच ताकद आहे मग विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे तिकीट असताना म्हणजे पक्षाची मतं असताना तीन नंबर ला का गेलात?पक्षाची मतं नसती तर डिपॉझीट सुद्धा राहिले नसते.
दोन नंबरचे धंदे करणारे अल्ताफ तांबोळी यांनी शब्द जरा जपून वापरावेत, अगोदर स्वतःची कुवत तपासावी. लॉक डाऊनच्या काळात गुटख्याची १०रू.ची पूडी १००रू.ला आपण ब्लॅकने विकून ५ कोटी रु. कमावले. आपल्याला लाज वाटली पाहिजे नगरसेवक असताना असे धंदे करता, विनापरवाना अनधिकृत बंगला बांधला. आज बागलांची चमचेगिरी करत बोलता .
२०१९ला विधानसभेच्या वेळी तुम्ही नारायण आबाकडे होता. आदिनाथ- मकाईच्या वाहनांना आपल्या दुकानातले टायर पूरवलेली बीलं अजून अडकलेलेत म्हणून आज बागलांचा एवढा पुळका करता.
जगताप गटाचा बालेकिल्ला असलेल्या वार्ड मधून व्यापारी मतदान दयायला तयार नव्हते, तेव्हा आमचे नेते जयवंतराव जगताप यांनी त्यांना मतदान करण्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक घेवून मतदान करण्याचे आवाहन केले होते. जगताप गटाची ताकद आपल्या मागे उभी केली होती हे विसरू नये. त्यावेळी आपण दोघे भाऊ आहोत असे म्हणत निवडूण येईपर्यंत पाय धरत होता.
ज्या वार्डात घड्याळाचे उमेदवार होते तेथे नगरसेवकांना मतं जास्त मला मतं कमी, अन् काँग्रेसच्या उमेदवारांच्या वार्डात मला लिड मिळाला मग तुमच्या मतांवर मी नगराध्यक्ष कसा झालो?स्वतःला स्वयंघोषीत मुस्लिम समाजाचा अध्यक्ष समजता, पण आजही शहरातील मुस्लिम समाज भाऊंच्या सोबत आहे.
मी केलेल्या विकास कामांबद्दल तुम्ही काय बोलावे?त्यासाठी माहितीचा अधिकार आहे, कोणीही ही माहिती मागु शकता. नगरसेवक म्हणून तुम्ही नेहमी मिटींगला गैरहजर राहता, आजपर्यंत वार्डातील किती नागरीकांच्या समस्या घेवुन, व विकास कामे मागायला माझ्याकडे आलात?
मी नगराध्यक्ष या नात्याने सगळ्या वार्डात विकासकामे केलेली आहेत. आदिनाथचा विषय काढता , युतीमधून जयवंतराव जगताप फक्त १ वर्ष चेअरमन होते मग २४ महिन्यांचा कामगारांचा पगार कसा थकला? तांबोळींनी बेताल व बिनबुडाची वक्तव्ये करू नयेत.

