निमगाव केतकीत रेडके ॲग्रो मार्ट चे उद्या होणार उद्घाटन..
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व आ.राहुलदादा कुल यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन.
इंदापूर: (२४ जुलै २०२१)निमगाव केतकी येथील डोंगरे कॉम्प्लेक्समध्ये कुस्तीगीर संघाचे महेंद्र रेडके आणि नारायण रेडके यांनी नवीन उभारणी केलेल्या रेडके ॲग्रो मार्ट चे रविवार दिनांक २५ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाचता माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि धनगर समाज युवक संघ महाराष्ट्र राज्याचे घनश्याम हाके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत या मार्ट चे उद्घाटन करण्यात येणार आहे.
निमगाव केतकी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी आणि दूध उत्पादकांसाठी उत्तम आणि दर्जेदार शेती पूरक खते, बी- बियाणे, दूध उत्पादक साठी लागणारे सर्व साहित्य, पशुखाद्य तसेच शेतीसाठी लागणारे कृषी अवजारे, कीटकनाशके, औषधे, इत्यादी सर्व सोयींनीयुक्त या मार्ट ची उभारणी केली असून याचे उद्घाटन उद्या दिनांक २५ जुलै २०२१ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. तरी या मार्ट ला शेतकऱ्यांनी भेट द्यावी असे आवाहन महेंद्र रेडके आणि नारायण रेडके यांनी केले आहे. हा कार्यक्रम कोरोना काळाचे नियम पाळून होणार असल्याचे महेंद्र रेडके यांनी सांगितले.

