अहमदनगर: नगरविकास,आदिवासी विकास, उच्च आणि तंत्रशिक्षण, मदत आणि पुनर्वसन, ऊर्जा राज्यमंत्री तसेच राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवार दिनांक २३ रोजी आपला नियोजित दौरा आटपून जिल्हा परिषद अहमदनर येथे अध्यक्षा राजश्री घुले आणि इतर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राहुरी तालुक्यातील अनेक विकासकामां बद्दल आढावा घेतला.
तसेच जिल्हा परिषदेच्या माद्यमातून सद्यस्थितीतील सुरु असलेल्या कामाची स्थिती, आणि कामांबाबत येणाऱ्या अडचणी मंत्री तनपुरे यांनी जाणून घेतल्या; चालु स्थितीत ज्या-ज्या गावांची कामे किरकोळ करणामुळे अपूर्ण असतील तर ते देखील मार्गी लागले पाहिजे त्याकरिता अधिकाऱ्यांना यावेळी सूचना देखील त्यांनी केल्या असून
प्रामुक्याने बारागाव नांदूर प्रादेशिक पाणी-पुरवठा योजना, राहुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंदे आणि तेथील पायाभूत सुविधा, नवीन उपकेंद्राचे प्रस्ताव आणि सद्य स्थितीची बाबत देखील माहिती त्यांनी घेतली.
महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद मार्फत सन २०२०-२१ लेखाशिर्ष ३०३४ व २४१९ मधून रस्ते व पूल परीक्षण कार्यक्रमांतर्गत राहुरी मतदार संघातील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी ते नांदगाव तालुका नगर हद्द रस्ता (ग्रामा१६६) मजबुतीकरण व खडीकरण करणे ३० लाख रुपये, वळण ते पाथरे रस्ता (ग्रामा ८६) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ४० लाख रुपये, वांबोरी ब्राह्मणी रस्ता ते ससे गांधले वस्ती रस्ता(ग्रामा१५०) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ३५ लाख रुपये, पिंपरी अवघड उड्डाणपूल ते देसवंडी वस्ती रस्ता( मायनर दोनच्या कडेने)(ग्रामा१२५) खडीकरण करणे २५ लाख ,जांभळी ते बन्सी वाडी रस्ता(ग्रामा११६) खडीकरण करणे ३० लाख रुपये ,ब्राह्मणी बसस्थानक ते बहीरोबा मंदिर रस्ता (ग्रामा१३९) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ४० लाख रुपये असे एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना नामदार तनपुरे म्हणाले की, मतदारसंघातील बहुतांशी रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती.परंतु, कोरोना संकटाच्या आपत्तीमुळे काही विकास कामे प्रलंबित होती. ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून दोन कोटी रुपये निधी मंजूर केल्याचे सांगितले. आपल्या मतदार संघातील अनेक विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच प्रलंबित विकास कामांना देखील मंजुरी मिळेल असे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या वेळी सांगितले. तसेच मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागत असल्यामुळे तेथील जनतेच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे , खडांबे 📲7350591600

