कविवर्य संदिप कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त रंगली काव्यधारा"
_________________________
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:- दिनांक ३० जून, बुधवारी,या संस्थेचे उपाध्यक्ष संदीप गणपती कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, "शब्दांगण " फेसबुक पेजवर हे संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.संदिप कांबळे हे मुळ बोरगांव ता.केज चे रहिवाशी असुन सध्या भिवंडीत आहेत. "मी कुणाला कळलो नाही..!" ही गझल संपुर्ण महाराष्ट्रात गाजली आहे.
या काव्य संमेलनाचा विषय अर्थातच पाऊस होता... "मन पावसाळी चिंब ".!
पाऊस म्हटला की, कवी आपली कविता घेऊन उगवणारंच आणि सादर करणार या समजाला छेद देणाऱ्या कविता सादर करण्यात आल्यात. महाराष्ट्रातील तमाम कवि /कवयित्री यांनी उत्तम दर्जेदार कविता सादर केल्यात. पाऊस हा विषय असला तरी मानवी मनाचा वेध घेणाऱ्या या कविता वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या होत्या.
या संमेलनातील सगळ्यात वयाने लहान असलेल्या अंकिता भूसणे या कवयित्रीने बालमनाला भावणारा पाऊस बोबड्या बोलाने प्रभाविपणे सादर करून, रसिकांची मने जिंकली. तर या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य सर यांनी दिवसभरात सादर केलेल्या कवितांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सादरीकरणातील नजाकतीचे नवीन विविध पैलू पहायला मिळालेत, हे सांगताना पूजा विचारे,संजय पाटील यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या सादरीकरणाला शाबासकीची थाप दिली. तसेच विषय जरी पाऊस असला तरी, सामाजिक आशयाच्या कवितांचा वेध घेऊन नवोदित कवी चांगलं लिहितात, हे आवर्जून नमूद केले.आणि आपल्या गझलेतून पावसाची विविध रूपे अनेकोत्तम शेरातून अगदी सहजतेने सादर करून या संमेलनाची सांगता झाली.
तत्पूर्वी या संमेलनाचे उदघाटन चंद्रकांत दादा वानखेडे यांनी दीप प्रज्वलीत करून केले. आणि आपल्या दमदार आवाजात एक सुरेल गीत सादर करून कवी संमेलनाची सुरुवात जोरदार केली. आणि मग या संमेलनात शिल्पा परुळेकर, निता श्रीवास्तव, संध्या सोंडे, धनाजी बुटुरे, ओतूरकर सर, प्राध्यापक हिरवे सर, आणि संदीप गणपती कांबळे यांनी आपल्या दर्जेदार, सकस कविता सादर करून संमेलनात विविध रंग भरले. तसेच या संमेलनाचे प्रमुख पाहुणे कवी /रंगकर्मी, अभिनेते सुधाकर वसईकर हे,जरी कवी संमेलन ऑनलाईन असले तरी छत्री घेऊनच अवतरले! आणि संमेलनात सादरीकरणाच्या वेगळेपणाचा रसिकांना फिल देऊन गेले. पण त्यांचं असं सूचक येणं खरं ठरलं! कारण संमेलनात शब्दसरीं बरसल्या आणि अक्षरशः कवितांचा धो धो पाऊस पडला.! त्यांनी " मेघ " ही प्रेम कविता तितक्याच उत्कटतेने सादर केली.
संदीप कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संमेलनात उपस्थित कवी /कवयित्रीचं स्वागत केलं.आणि आपली कविता सादर केली.निता श्रीवास्तव यांनी सगळ्या सहभागी कवी / कवयित्री यांचे आभार मानून संमेलनाची सांगता केली.
या संमेलनात महाराष्ट्रातील कवी
श्री अनिल गव्हाणे (बीड) उदय क्षीरसागर (भिवंडी) कैलास बोरकर (औरंगाबाद) बिभीषण गिरी (उस्मानाबाद) ,प्रा.बी.जे.हिरवे (केज) साबीर सोलापूरी(सोलापूर)प्रा सुरेश हिवाळे (सेलू) गया गवळी (वसई) सुरेखा कुळकर्णी (वसई) निलम पाटील (विरार) शितल संखे (बोईसर) प्रभाकर पवार (कल्याण) नंदा कोकाटे (ठाणे) पुजा सावंत (मिरा रोड) अक्षदा देशपांडे (मिरा रोड) राजेश साबळे (ओतूर) विजय जाधव (मुरबाड) साक्षी फाटक( भिवंडी) प्रवीण खोलबे.. प्रभा सोनावणे.. कमलाकर लोहार.. आदी कवींनी सहभाग नोंदविला होता.

