shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

३१ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर - मनोज कोकाटे..!!

माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या  विशेष प्रयत्नांमुळे निधी मंजूर..!!

प्रतिनिधी :संजय वायकर

चिचोंडी पाटील : (दि .३) नगर तालुक्यातील विविध विकासकांमासाठी नगर-श्रीगोंदा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ग्रामविकास विभागाच्या लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत ३१ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे यांनी दिली.


यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून विविध गावातील विविध विकासकामे होण्यासंदर्भात ग्रामस्थांची आग्रहाची मागणी होती. याचीच दखल घेऊन सदर बाब आ.बबनराव पाचपुते साहेब यांच्या निदर्शनास आणून देताच पाचपुते साहेब यांच्या विशेष प्रयत्नामुळे ग्रामविकास विभागाच्या लेखाशीर्ष २५१५ मधून विविध विकासकामांसाठी ३१ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला.

सदर निधीतून चिचोंडी पाटील येथील रस्ता काँक्रिटीकरण, मांडवे येथील साकळाई मंदिर सभामंडप व पारेवाडी येथील स्मशानभूमीचे बांधकाम ही विकासकामे मार्गी लागणार असून माजी मंत्री आमदार पाचपुते साहेब यांच्यामुळे निश्चितच तालुक्यातील अनेक गावांचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार असून या पुढील काळात देखील अधिक स्वरूपातील निधी पाचपुते यांच्याकडून प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन यावेळी तालुकाध्यक्ष तथा सरपंच मनोज कोकाटे यांनी केले.

सदर निधी मंजूर केल्याबद्दल चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे, मांडवे गावचे सरपंच सुभाष निमसे, पारेवाडी गावचे सरपंच राहुल शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार बबनराव पाचपुते यांचे आभार व्यक्त केले.
close