प्रतिनिधी : संजय वायकर
जळगाव : ( दि .३ ) इंधन दरवाढ विरोधात राजकीय पक्ष नौटंकी करतात. त्याऐवजी जनतेला आकडेवारी सहित सांगितले पाहिजे. यात काय चूक?काय बरोबर?हे मांडले पाहिजे. पण तसे न करता खुशाल रस्त्यावर नौटंकी करतात.याचा अर्थ असा होतो कि यांनाच कळले नाही तर आम्हाला कसे सांगणार?समजा भाजप सरकारने इंधन दरवाढ चुकीने केली,जनतेला त्रस्त करण्यासाठी केली,पैसे कमवण्यासाठी केली, ते तरी मांडा.पण तितकी समज, उमज असलेला नेता कोण ?नाहीच.माझ्या जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस, राष्ट्रवादी चे दोन्ही अध्यक्ष याबाबत मैदानात ,सभेत बोलू शकतील का? दोन्ही तर कसेबसे सरळ उभे राहातो.
मराठ्यांचे नेतृत्व जळगाव जिल्ह्यात अशा लोकांना दिले आहे कि,त्यांना कोणी नेता मानत नाही. म्हणून तर जळगाव जिल्ह्यातील लोक खडसे,महाजन,गुलाबराव पाटील यांच्या कडे जातात.राष्ट्रवादी आणि कांग्रेस चे दोन्ही अध्यक्ष फक्त नामधारी कठपुतली आहेत.नेतृत्वाचा कोणताही अंश त्यांच्यात नाही. एकाला आईची पुण्याई,दुसऱ्याला बापाची.अशी माणसे जिल्हा अध्यक्ष देऊन जाणीवपुर्वक कांग्रेस आणि राष्ट्रवादी बरबाद करण्याचा डाव आहे कि काय?हेच नाहीत तर इतर दुसरा कोणता नेता आहे जो खडसे,महाजन, गुलाबराव समोर ताठ मानेने उभा राहू शकतो?देवकरचे तर जैनसोबत पुरते मानसिक बळ हरवलेले आहे.
सरकारी कार्यालयातील सिपाई जुमानत नाही. तहसीलदार ,कलेक्टर, बीडीओ, सीईओ कशाला उभे करतील?जळगाव जिल्ह्यातील कांग्रेस आणि राष्ट्रवादीमधे पॉलिटिकल स्क्रैब जमा आहे.तो हटवल्याशिवाय नवे फर्निचर कुठे ठेवणार?ही भंगार हटवल्याशिवाय नवीन माणसे घेता येत नाहीत.
प्रश्न असा पडतो कि,शरद पवारांना देवकर आणि भैय्यामधे कोणते नेतृत्व दिसले?तसेच कांग्रेस ला संदिप पाटील यांच्यात कोणते धाडस दिसले?कि ते छातीठोकपणे आधिकारी समोर उभे राहातील? या दोन तीन माणसांना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या माथी मारून काय साध्य करायचे आहे?हे विचारले पाहिजे.
जयंत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले.लेवा भवन मधे चोरांच्या भानगडीत वेळ घालवला.तितका वेळ सामान्य जनतेसाठी दिला असता तर,काहीतरी पदरात पडले असते.इकडे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात अभिजीत पाटलांनी गाव गोळा करून घेतले.हॉल खचाखच भरला.लोक कंटाळले.काही तर निघून गेले.बरे! जयंत पाटील आणि म्हणाले,लवकर आटोपते घ्या.मी चाललो विमानाने उडत.सांगा,काय ऐकायचे?काय बोलायचे?
तसेच नाना पटोले आले.अर्धा दिवस फैजपूर आणि अर्धा दिवस गोदावरी फाऊंडेशन.सर्व कार्यक्रम इनडोअर झाले. संध्याकाळी थोडा वेळ कांग्रेस भवन मधे आणि बारा वाजता अमळनेर. हा दौरा फेल गेला.कदाचित इनडोअर दौरा म्हणू शकता.दौरा आऊटडोअर झाला पाहिजे. नेता मैदानावर खेळला पाहिजे.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि कांग्रेस मधे थोडीफार उर्मी आणायची असेल तर आधी दोन्ही अध्यक्ष बदलले पाहिजे.अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाहून कोणालाही वाटत नाही कि हे मराठे रणांगणात जाऊन लढतील. मुंबई च्या नेत्यांचा दौरा खुलेआम झाला पाहिजे.
....शिवराम पाटील.
9280963122
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

