shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे सालाबादप्रमाणे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान

संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे सालाबादप्रमाणे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान
 
◆मंदिरामध्येच विसावला पालखी सोहळा ◆

आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेत पादुका स्नान , विधिवत पूजा , गोपाळकाला करून पालखी  सोहळ्याची होणार सांगता 

इंदापूर (तालुका प्रतिनिधी)
 
इंदापूर तालुक्यातील गुलाबनगर ( रेडा) गावातील महाराष्ट्रसह अनेकांचे श्रद्धास्थान असलेले संत गुलाबबाबा मंदिर असून तिथून संत गुलाबबाबा पालखी सोहळा पायीवारी पालखी सोहळा निघत असतो.(दि.१४ )रोजी सालाबादप्रमाणे विधिवत पूजा करून पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झाला. यावेळी संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव देवकर,  पत्रकार कैलास पवार  बोलताना म्हणाले की ,संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे पालखी  सोळावे (१६)वर्षे असून कोरोनाच्या  पादुर्भावामुळे हा पालखी सोहळा साध्या पद्धतीने सालाबादप्रमाणे प्रस्थान करत असून संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पालखी सोहळा पाच दिवस मुक्काम करणार असून रोजच्यारोज प्रवचन ,भजन मोजक्या वारकरी मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून विविध रोजच्यारोज पूजा होणार आहे.

 आषाढी एकादशी दिवशी संत गुलाबबाबा यांच्या पादुका नीरा नरसिंहपूर संगमावरती चंद्रभागेचा जिथून उगम झाला तिथे स्नान करून परत मंदिरामध्ये आणल्या जातील आणि गोपाळकाल्याचे किर्तन मोजक्याच वारकरी मंडळी झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होईल असे त्यांनी पालखीसोहळ्या बाबत माहिती दिली . यावेळी रेडा गावचे सरपंच सौ.सुनिता देवकर ,युवा नेते नानासाहेब देवकर ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार, धनंजय गायकवाड, संत गुलाबबाबा संस्थानचे सचिव तुकाराम जगदाळे बोलताना म्हणाले की, आज संत गुलाबबाबा पालखी सोहळा प्रस्थान होत असतो. आजच संतराज पालखी सोहळा गुलाबनगर (रेडा) गावात आगमन होत असते. दोन्ही पालखी सोहळ्याच्या वारकरी मंडळीने गुलाबनगर (रेडा) गजबजून जाते.  प्रत्येक जण आपापल्या घरी वारकरी भोजनासाठी घेऊन जात असतो .आपापल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करत असतो. पण कोरोनामुळे हा आनंद  गेली दोन वर्षे घेता येत नाही त्याची आम्हाला भाविकांना खंत वाटते.

 महिला मंडळ यांनी बोलताना म्हणाल्या की, आम्ही वर्षभर संत गुलाबबाबा पालखी सोहळा व संतराज पालखी सोहळ्याची वाट पाहत असतो .घरापुढे रांगोळ्या काढून, घरामध्ये सजावट करून वारकऱ्यांना भोजन   सेवा, रिंगण असा सांप्रदायिक कार्यक्रमची वाट पाहत असतो .पण  कोरोनामुळे आनंद आज आम्हाला लुटता येत नाही तरी ही साध्या पद्धतीने का होईना हा सोहळा संपन्न झाला याचा आनंद आहे. यावेळी पालखी सोहळ्याचे मानाचे अश्‍व सराफवाडी  येथील भागवत धायगुडे, चोपदार ,विणकरी, तुळशी वृंदावनचे मानकरी उपस्थित होते. कोरोनाचे जगावर मोठे संकट ओढवले आहे आणि त्यामुळे गेली दोन वर्षे पंढरपूर येथे वारी किंवा पालखी सोहळा शासनाच्या निर्बंधांमुळे होत नाही.  मानाच्या मोजक्याच  पालख्यांना शासनाने मान्यता दिल्यामुळे इतर पालखी सोहळे व दिंड्या आपापल्या गावातच साध्या पद्धतीने पालखी प्रस्थान प्रस्तान करून विधिवत पूजा करत आहेत असे पहावयास मिळत आहे. 

संत गुलाबबाबा कर्मभूमी काटेल धाम व जन्मभूमी टाकरखेड मोरे येथून काटेल धाम संस्थान अध्यक्ष सोनूमामा भाटिया, सचिव डॉ. पुरुषोत्तम दातकर सर्व विश्वस्त मंडळ, आणि टाकरखेड येथील संत गुलाबबाबाचे वंशज ज्ञानेश्वरभाऊ उमक, गोपाल उमक सर्व विश्वस्त मंडळ  , पुणे, सोलापुर, नंदुबार, नागपुर, सागर(म.प्र), रायपुर, औरगांबाद, मुंबई, अलिबाग येथील भक्तांनी दूरध्वनीवरून पालखीसोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

 संत गुलाबबाबांचे भक्त हे महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक राज्यातून आणि जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातील संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यास भक्त मंडळी येत असतात. उद्योजक ,व्यावसायिक, व्यापारी यांचीही मोठी उपस्थित असते. या कार्यक्रमासाठी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष  अँड.तानाजीराव बाबुराव देवकर, सरपंच सौ. सुनीता देवकर , सचिव तुकाराम जगदाळे ,माजी सरपंच तुकाराम देवकर  नानासाहेब देवकर, अँड .योगेश देवकर, संतोष  देवकर , शेटफळ हवेलीचे संत गुलाबबाबा भक्त मंडळ , रत्नदिप शिंदे ,उमेश पाटील,दिलीप देवकर, आदिनाथ देवकर ,बापु शिंदे, किसन देवकर,  ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार,धनंजय गायकवाड, हरीचंद्र देवकर ,चोपदार ज्ञानदेव गोळे,  बाळासाहेब कुंभार ,गणपत शिंदे ,अशोक मोहिते महाराज ,बापु गुरव, गणपत जाधव ,जनार्दन गोसावी, ज्ञानदेव पवार, काशिनाथ देवकर, रेडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश खारमाटे,  कर्मचारी गणेश वाघ, महिला मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 संत गुला बाबा सोळहा रेडागावातुन प्रस्थान होऊन पहिल्या दिवशी मारुती मंदीरातच मुक्काम असतो. त्याच दिवशी संतराज पालखी सोहळा हि रेडागाव मध्ये आगमन असते, दोन्ही पालख्यांचा  प्रितीसंगम पाहण्याजोगा असतो. (दि.१५) पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होते.  त्यानंतर संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम बावडा येथील बागल फाटा तिसरा मुक्काम दत्त मंदीर मायनर  (श्रीपूर) , चौथा बंडीशेगाव (कोळयाचा मळा ) ,पाचवा वाखरी(पंढरपूर) , दोन दिवस पालखी सोहळा पंढरपूर मध्ये मुक्काम करून आषाढी एकादशी करुन गोपाल काल्याचे किर्तन होताच परतीचा प्रवास सुरू होतो. नामवंत  कीर्तनकारांचे कीर्तन,  प्रवचन, भजन, भारुड अनेक कार्यक्रम होत असतात. डॉक्टर मंडळी ही रुग्णांची सेवा करत असतात. आपली सेवा देत असतात. अनेक भक्त भोजनाच्या पंगती, नाष्टा चहापाणी अशी ही व्यवस्था करत असतात. हा सोहळा गेली दोन वर्ष कोरानामुळे  साधेपणाने  होत आहे . प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून हा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं आणि लोकांनी त्याचा आनंदही लुटला . कोरोनाचे नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने श्री संत गुलाबबाबा पालखी प्रस्थान झाले आणि  टाळ-मृदुंग, ज्ञानोबा - तुकाराम ,गोपाला गोपाला च्या नाम घोषाने अवघे वातावरण गुलाबमय झाले होते.
------
फोटो ओळी : गुलाबनगर (रेडा,ता.इंदापूर, पुणे) येथील श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे सालाबादप्रमाणे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान होताना (छाया : कैलास पवार)
close