shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव शिंदे आमरण उपोषण करणार..!!

फंड, ग्रॅच्यूएटी च्या रकमा देण्यास सभापती बंडगर करताहेत टाळाटाळ : -

प्रतिनिधी । रतन काळे:

करमाळा : (दि .१५) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होऊन अद्याप देखील त्यांच्या भविष्य निर्वाह निधी, उपदान व रजा रोखीकरणाच्या रकमा सभापती शिवाजी बंडगर यांनी सही न केल्यामुळे मिळालेल्या नाहीत . शिंदे यांनी बाजार समितीत ३७ वर्षे सेवा केलेली आहे . त्यांचे भनिनिधी, उपदान व रजेचे चेक तयार असून देखील सभापतींनी जाणीवपूर्वक शारीरीक, मानसिक व आर्थिक छळ करण्याचे उद्देशाने व वैयक्तिक, राजकीय व्देषातून स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केलेली आहे . 


बाजार समितीच्या इतिहासात सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या रकमा देण्यास अशी टाळाटाळ कधीही झालेली नाही . मला बीपी व शुगरचा त्रास असून सध्या मी फार तणावात आहे तरी माझ्या देय रकमा मला तातडीने द्याव्यात अशी मागणी मी सभापती बंडगर यांचेकडे लेखी स्वरूपात केली आहे . 

माझ्या आयुष्यभराची पुंजी सभापती बंडगर यांनी कोणतेही कारण न देता, बाजार समितीकडे आर्थिक तरतूद असताना, रकमा देणेबाबत समितीने संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर केलेला असताना देण्यास टाळाटाळ करीत आहेत . मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उद्या सही करतो, सोमवारी करतो, पुढच्या आठवड्यात करतो असे सांगत माझा अक्षरशः छळ चालविला आहे . 

आता तातडीने माझ्या हक्काच्या देय रकमा मला न दिल्यास मी माझी पत्नी व कुटुंबियासह आमरण उपोषणास बसणे शिवाय पर्याय नसल्याचे सुनील शिंदे यांनी सांगीतले . तसेच मला या ताणतणावामुळे, बीपी शुगर वाढून माझे काही बरेवाईट झाल्यास सभापती शिवाजी बंडगर जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घेणेबाबत सुनील शिंदे यांनी कळविले आहे .

करमाळा बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे यांनी त्यांच्या सेवानिवृत्तींच्या रकमा मिळणेबाबत बाजार समितीकडे सभापतींच्या नावे अर्ज केला आहे . शिंदे यांचे सर्व धनादेश तयार असून सभापतींनी सही केल्यास देण्यास अडचण नाही असे  विठ्ठल क्षीरसागर कार्यरत सचिव , बाजार समिती करमाळा यांनी म्हटले आहे .

करमाळा बाजार समितीचे सेवा निवृत्त सचिव श्री सुनील शिंदे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या रक्कम देणे गरजेचे आहे. श्री . शिंदे यांच्या पाठीशी बाजार समितीचे सर्व कर्मचारी असून वेळप्रसंगी उपोषणाचे मार्ग अवलंब करू असा इशारा महेश ढाणे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटना यांनी दिला आहे.
close