भारत ननवरे यांची इंदापूर शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मोहन दुधाळ परिवाराच्या वतीने सत्कार ..!!
इंदापूर:(दि.१५ जुलै २०२१) पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ भारती दुधाळ व कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते प्रगतशील बागायतदार मोहन दुधाळ यांचे हस्ते शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांचा सपत्नीक सत्कार.
शिक्षक समिती इंदापूरच्या नुतन कार्यकारणीत शेळगावचे सुपुञ , शिक्षक सोसायटीचे माजी तज्ञ संचालक , गुणवंत शिक्षक , युवा शिक्षक नेतृत्व भारत ननवरे यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ भारती दुधाळ व कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते , प्रगतशील बागायतदार , सामाजिक कार्यकर्ते मोहन दुधाळ यांचे निवासस्थानी भारत ननवरे व सौ रेखा भारत ननवरे यांचा सपत्नीक सत्कार केला.पुढील कार्यास शिक्षक समिती नुतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.
यावेळी सत्कार केल्याबद्दल भारत ननवरे यांनी आभार मानून सदर पदाचा शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करून पदाचा मान सन्मान राखला जाईल असे कार्य या कार्यकाळात करून दाखवीन असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी दुधाळ यांचे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
*

