प्रतिनिधी । रफिक शेख- नारायणडोहो:
नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे दिनांक 1 जुलै 20 21 रोजी श्री बंसी भाऊ म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी काझीच्या प्राचार्यपदी श्री कुमार कोंडीभाऊ म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना जिल्हा सहकारी बँकेचे मा. चेअरमन व नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री संपतराव म्हस्के यांच्या शुभहस्ते श्री कुमार म्हस्के सरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी टाकळी काझी च्या मा. सरपंच सुनीता ताई ढगे ,माजी प्राचार्य पैलवान मॅडम ,श्री सुभाष काळे ,डॉक्टर रोहित करांडे ,सुनील म्हस्के सर व विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत म्हस्के सरांनी विद्यालयाचा पदभार स्वीकारला श्री जिवडे सरांनी उपस्थितांचे आभार मानले.

