shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरीने राबवला वृक्षारोपणाचा कार्यक्रम..!!

                  
प्रकाश मुंडे  । बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
पर्यावरणाचे महत्व जाणून केज रोटरीने रोटरी वर्षाच्या 01 जुलै या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरातील मुख्य महामार्गाच्या कडेला वटवृक्षांचे वृक्षारोपण केले.

केज शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेली वडांची झाडे हे शहराचे भूषण होते. मात्र महामार्ग रस्त्याच्या विस्तारीकरण विकास कामात ही सर्व झाडे तोडण्यात आली आहेत. शहराला वडांच्या झाडाचे गतवैभव मिळवून देण्याचा केज रोटरीचा संकल्प असून काम पूर्ण झालेल्या शहर अंतर्गत महामार्गाच्या उत्तरेकडील विश्रामगृह, न्यायालय, पंचायत समिती, फलोत्पादन  जागेच्या बाजूने शंभर फुटांवर एक याप्रमाणे वडांची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यातील पहिल्या पन्नास झाडांचा पहिला टप्पा लागवड एक जुलै रोजी सुरू करण्यात आला आहे. 

विद्यमान अध्यक्ष बापूराव सिंगण व सचिव अरुण अंजान यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच उपक्रम राबविण्यात आला आहे.

हा उपक्रम राबविण्यासाठी अध्यक्ष बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन भीमराव लोखंडे, उपप्रांतपाल दादाराव जमाले पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.         

यावेळी युवा कार्यकर्ते अमर पाटील यांची उपस्थिती होती.
close