पाठपुराव्याला आले यश .. प्रविण कोकाटे..
प्रतिनिधी :आसावरी वायकर
चिचोंडी पाटील (दि .३) : पशु वैद्यकीय दवाखाना ते बेकरी पर्यंत तसेच जामा मस्जिद ते दायरा मस्जिद पर्यंतचा रस्ता कॉंक्रीटिकरणासाठी 10 लक्ष निधी मंजुर केल्याबददल माजी मंत्री तथा नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री.बबनराव (दादा) पाचपुते यांचे प्रविणदादा कोकाटे यांनी आभार व्यक्त केले .
या कामासाठी नगर तालुका पंचायत समिती मा.सभापती इंजि. प्रविणदादा पांडुरंग कोकाटे यांनी आमदार बबनदादा पाचपुते यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता .
बबनराव पाचपूते यांनीही सदर कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते .
या कामासाठी निधी मंजुर केल्या बद्दल आमदार साहेबांचे चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

