इंदापूर नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदी विजय (भाऊ) वाघमोडे यांची निवड झाल्याबद्दल आमचे मेंबर मित्रपरिवार इंदापूर व वडार पॅंथर संघटना चे उपाध्यक्ष अनिल पवार यांच्या वतीने जाहीर सत्कार.
इंदापूर: (दि.३ जुलै २०२१)इंदापूर येथील विजय मारुती वाघमोडे यांची इंदापूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल आमचे मेंबर मित्र परिवार इंदापूर व वडार पॅंथर संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनियुक्त नगरसेवक विजय वाघमोडे म्हणाले की, इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून इंदापूर शहरातील तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी ज्या सुख सोयीसुविधा देता येतील त्या देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन तसेच इंदापूर करांच्या प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडून ते वेळोवेळी सोडवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करीन आमचे मेंबर मित्र परिवार मार्फत अनिल पवार यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.
यावेळी अनिल पवार म्हणाले की, इंदापूर शहरातील एक तरुण तडफदार कार्यकर्त्याची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याने युवकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. विजय भाऊ वाघमोडे हे या संधीचे सोने करून जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा असून त्यांचा या निवडीबद्दल मी त्यांचे जाहीर मनःपूर्वक अभिनंदन करतो.
यावेळी रोहिदास पवार ,पिंटूसेठ घोडके ,दुर्गादादा शिंदे ,लखन चौगुले, शिवराम पवार, अविनाश चौगुले, सतीश चौगुले बाबासाहेब विटेकर अनिल चौगुले, श्रीराम पवार, सचिन शिरसागर इत्यादी उपस्थित होते.

