प्रतिनिधी । विनया मेढेकर:-
बोरगाव: खालापूर तालुक्यातील पोखरवाडी बंधारा, बोरगाव येथील धरणात बुडून वाशी नाका चेंबूर-मुंबई येथील एका इसमाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 24 जुलै रोजी चेंबूर-मुंबई येथील राहुल जाधव वय 31 वर्षे नामक इसम हे पोखरवाडी बंधारा, बोरगाव येथे आपल्या चार मित्रांसोबत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिरायला आले असता ते धरणाच्या खालच्या बाजूला आंघोळीसाठी उतरले. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने राहुल जाधव हे 5 वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली बुडाले. त्यावेळी स्थानिक नागरिकांकडून त्याचा शोध घेतला गेला परंतु ते कुठेही सापडले नाही,तरी रात्री उशिरा पर्यंत त्यांचे शोध कार्य सुरू होते.
आज सकाळी (25 जुलै) रोजी सकाळी 9 वाजता राहुल जाधव हे मृत अवस्थेत सापडले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह सरकारी हॉस्पिटल चौक येथे पाठवण्यात आले आहे.सदर अकस्मात मुत्युचा तपास पो. हवा. हिंदोळा करीत आहेत...

