प्रतिनिधी । विनया मेढेकर :-
महाड: महाड तालुका तळीये ग्रामस्थांची रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे ,खासदार सुनिल तटकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर, रायगडचे माजी खासदार गिते यांनी तळीयेला भेट दिली होती. आता महाराष्ट्राचे राज्यपाल मंगळवारी तळीयेला जाणार आहेत. तळीयेमध्ये राज्यपाल भेट देऊन घटनास्थलाची पाहणी करतील.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज मंगळवार 27 जुलै 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार 27 जुलै 2021 रोजी सकाळी 9.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून महाड जि. रायगड कडे प्रयाण. सकाळी 10.20 वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 10.25 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10.35 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून तळीये ता. महाड कडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. तळीये, ता.महाड येथे आगमन व दरडग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.45 वा. तळीये ता. महाड जि. रायगड येथून पिडिलाइट विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 12.10 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.20 वा. पिडिलाइट विश्रामगृह येथून महाड एमआयडीसी हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 12.25 वा. महाड एमआयडीसी हेलिपॅड येथे राखीव. दुपारी 12:30 वाजता महाड एमआयडीसी हेलिपॅड येथून गुहागर जि.रत्नागिरी कडे प्रयाण करतील.