कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून इंदापूर मधील शहीदस्मारक येथे दीपोत्सव करून वीर शहीद जवानांना आदरांजली वाहून माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
युवा क्रांती प्रतिष्ठान, त्रिदल माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य, जय हिंद माझी संघटना इंदापूर तालुका, शिवभक्त परिवार यांच्या वतीने कारगिल विजय दिन इंदापूर येथे साजरा .
इंदापूर येथे (दि.२६ जुलै २०२१) रोजी कारगिल विजय दिनाच औचित्य साधून २२ व्या वर्षा निमित्त..इंदापूर नगर परिषद येथील शहिद स्मारकला दिपोत्सव व नगर परिषद येथील असलेल्या विश्वरत्न डाॕ.भिमरावजी आंबेडकर व श्री छञपती शिवाजी महाराज या महापुरूषांच्या पुतळ्यांना युवा क्रांती प्रतिष्ठाण व त्रीदल माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य ,जयहिंद माजी संघटना इंदापूर तालुका शिवभक्त परिवार यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच युवा क्रांती प्रतिष्ठाण,धरमचंद लोढा ,वसंतराव माळुंजकर अस्लम शेख कामधेनु परिवाराचे डाॕ. लक्ष्मणआसबे यांचे हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी झालेले मेजर गवळी साहेब यांचा विशेष सन्मान युवा क्रांती प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप व संस्थापक उपाध्यक्ष धरमचंद लोढा, युवा क्रांती प्रतिष्ठाण चे विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर तसेच डाॕ. जयंत नायकुडे , बाळासाहेब ढवळे व इंदापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते हमिदभाई आतार यांचे हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा हार फेटा बांधुन सन्मान करण्यात आला .
या वेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत शिताप यांनी सांगितल की, कारगिल विजयदिन साजरा करायचे हे युवा क्रांती प्रतिष्ठाणच आकराव वर्ष आहे. तरुणां मध्ये देशप्रेम जागृत करणे आणि समाजा मध्ये सैनिका प्रती आदरभाव निर्माण करणे हेच आजच्या कार्यक्रमाचा मुख्य ऊद्देश आहे. जगाच्या इतिहासात लढल्या गेलेल्या लढाया पैकी अतिशय अवघड अशा रणभुमीत प्रतिकुल परिस्थितीत अठरा हजार फूट ऊँचावर रक्त गोठवणार्या तापमाणात शत्रू समोर दिसत नसताना ही ५३७ हून अधिन भारतमातेच्या सुपुत्रानी आपल्या प्राणाची आहूती दिली. अठराशेहून अधिक सैनिक जायबंदी जखमी झाले. आशा परिस्तीथित हा विजय परमोच्य शौर्याच आणि जाज्वल राष्ट्रप्रेमाच प्रतिक आहे .म्हणून हा विजयदिन साजरा करण्यात येतो. यावेळी लक्ष्मण आसबे, विशाल बोंद्रे, गफूरभाई सय्यद याँनी मनोगत व्यक्त केली .
यावेळी शेकडो माजी सैनिक व इंदापूर शहरातील देशभक्त नागरिक उपस्थित होते. तसेच इंदापूर शहर शिवसेना अध्यक्ष सन्माननिय मेजर महादेवजी सुर्यवंशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.मनेष जाधव, प्रदिप पवार,अशिष देवकर अस्लमभाई शेख निरंजन भोंग यांनी कार्यक्रम यशस्वीपणे करण्यात मोलाचे सहकार्य केले

