shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव जळी येथे कृषी कन्येचे आगमन..!!

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सेवा संस्थेच्या मालदाड (ता.संगमनेर) येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या निशा मच्छिंद्र जोंधळे हीचे नुकतेच निमगाव जाळी येथे अभ्यास दौऱ्या निमित्ताने आगमन झाले आहे. 


कृषी कन्या निशा हिने सरपंच श्री.अमोल भाऊसाहेब जोंधळे तसेच इतर मान्यवरांना भेटून त्याच्याकडून गवाविषयी माहिती मिळवली आणि गावातील अनेक अडचणी जाणून घेतल्या आहेत. अभ्यास दौऱ्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत माती परीक्षण,फळबाग लागवड, ऐकत्मिक कीड व रोग व्यवस्थापन, जनावरांचे लसीकरण, बीजप्रक्रिया, शेतीतील अवजारांचा, वापर शेतीचे आर्थिक नियोजन याबाबत आयोजन करून आधुनिक शेती तंत्रण्यानविषयी जनजागृती करणार आहे. या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक मा.श्री.साहेबराव नवले, डॉ.अरविंद हरदे, डॉ.अशोक कडलक, प्रा.निलेश तायडे व सर्व कार्यकारी अधिकारी व कार्यक्रम अधिकारी प्रा.जयेश धांगडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

close