shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोरी येथे गौरी किराणा आणि सुपर मार्केटचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न..!!

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील शिंदे वस्ती या ठिकाणी उत्तम ज्योतीराम शिंदे यांचा मुलगा ज्ञानदेव शिंदे माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी गौरी किराणा आणि सुपर मार्केट चे शिंदे वस्ती व बोरी गावातील नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार घरगुती साहित्य गावातच मिळावे या उद्देशाने या व्यवसायाची व्यापक स्वरूपात उभारणी केली असून त्याचे उद्घाटन दिनांक १८ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.






यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य  प्रताप  पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापुर तालुका अध्यक्ष  शुभम निंबाळकर, माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे बारामती तालुका अध्यक्ष  संतोष बोराटे , इंदापुर तालुका अध्यक्ष  बापुसाहेब बोराटे, बारामती तालुका महिला अध्यक्षा  स्वप्नाताई लोणकर, उपाध्यक्ष  सीमाताई पांढरे आणि इंदापुर तालुका कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापुर तालुका उपाध्यक्ष  अक्षय माळी  , माळशिरस तालुका संघटक  गणेश शेंडे आणि  महेश फोटोग्राफी बारामती चे मालक  महेश लोणकर  आणि बोरी गावचे सरपंच  संदीप दादा ठोंबरे , बोरी गावचे माजी उपसरपंच  रमेश आण्णा शिंदे ,बोरी गावचे माजी चेअरमन  संतोष शिंदे,  रामभाऊ जोरी, रामनाना शिंदे , सतीश नाना शिंदे, आणि बोरी गावचे सर्व प्रतिष्ठित राजकीय सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. 


यावेळी ज्ञानदेव शिंदे आणि शिंदे परिवार यांना गौरी किराणा व सुपर मार्केट च्या उभारणी बद्दल शुभेच्छा व्यक्त करून

भरणे म्हणाले की आजच्या या काळामध्ये नोकरीपेक्षा तरुणांनी व्यवसाय उद्योग धंदे याकडे वळले पाहिजे आणि आपल्या जीवनाचा पाया भक्कम केला पाहिजे. कोरोना संपलेला नाही सर्वांनी मास्क वापरावे वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे सोशल डिस्टंसिंगचे पालन केले पाहिजे. तरच आपण कोरोना संक्रमण पासून दूर राहू शकतो.

ज्ञानदेव शिंदे यांनी शिक्षण व आरोग्य निरीक्षक यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता त्यांनी शेती, किराणा व्यवसाय आणि पुणे या ठिकाणी सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी हा व्यवसाय ही ते करीत असून त्याबरोबर ओबीसी युवा नेता महाराष्ट्र राज्य तसेच माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून हे ते सामाजिक कार्य करीत आहेत

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ तालुका  आमदार  यशवंत  माने यांनी दुपारी ३ वाजता सुपर मार्केटला भेट देऊन शिंदे परिवाराला शुभेच्छा दिल्या.


 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आदर्श शिक्षक  बबन जगताप यांनी केले. तर आभार  विनायक शिंदे व सुनील शिंदे यांनी मानले.

close