shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जन्मदिवस साजरा..!!


देवळाली प्रवरा, दि. २७ जुलै :
देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने देवळाली प्रवरा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचा जन्मदिवस साजरा करणेत आला. 

       
रोटरी ब्लड बँक राहुरी यांचे सहकार्याने आयोजि करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सकाळी ९.०० वाजता देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांचे हस्ते बाजारतळ येथील आराध्या कॉम्प्लेक्स येथे फित कापून रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. या प्रसंगी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, अमजद इनामदार, अनिस शेख, वर्षा संसारे, ऋषीकेश संसारे, डॉ. सुनील  कदम, सागर सोनवणे, कुमार भिंगारे आदी मेडिकल हेल्प टीम चे सदस्य हजर होते. 
       
आदरणीय मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे जन्मदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी कोरोना काळात केलेले कार्य पाहता त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करणेसाठी देवळाली मेडिकल हेल्प टीमच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे टीमच्या वतीने दत्ता कडू यांनी सांगितले, तर मुख्याधिकारी यांनी उपक्रमाचे कौतुक करून मुख्यमंत्री महोदयांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  
      

विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, यांनी या शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. रक्तदानसाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. या रक्तदान शिबिरात दुपारी २.३० वाजेपर्यंत ५५ रक्तदात्यांची रक्तदान केले.  देवळाली प्रवरा येथील कर्मवीर करियर अकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू यांचे या शिबिरास विशेष सहकार्य लाभले.
close