shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🚩 हीच ती जागा...अन हीच ती---पावनखिंड..!!



बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे व ३००मावळ्यांच्या नरवीरांच्या रक्ताने पावन झाली.

करमाळा: प्रतिनिधी

  तारीख 12 व 13 जुलै 1660.
   जिथे बाजीप्रभूंनी यमालासुध्दा
सांगितले होते....
थांब अजून राजे
गडावर पोचले नाहीत.. तोपर्यंत
हा बाजी शरीर सोडत नाही..
बाजीप्रभू ,फुलाजीप्रभू देशपांडे
व सर्व ज्ञात अज्ञात मावळयांच्या 
शौर्य ,धैर्य, पराक्रम, निष्ठा आणि बलिदानास त्रिवार वंदन.पावनखिंडीतील या
रणसंग्रामास 361 वर्ष पुर्ण.🚩


या बलशाही देहाकडे पाहताना समजते कि...

 _राजे विशाळगडावर सुखरुप पोहचताच तोफ डागल्याचा आवाज कानावर येई पर्यंत हा देह शत्रूशी कसा बेभान होऊन लढत होता_ ⚔️
 
१३_जुलै_१६६०
पावनखिंडीचा_रणसंग्राम


   
रात्रभर बाण चालवून चालवून हाताच्या बोटांची टवकं उडाली, पार चामडं सोलून निघाल पर समदं ध्यान मातुरं तोफेच्या आवाजाकडं हुतं, अंधारात सोडलेला प्रत्येक बाण नागिणी सारखा दुश्मनांच्या नरडीचा घोट घेत हुता, कान आसुसलं हुतं बांदल शेनेचं कधी बार उडतुया, एक एक  बांदल 100 दुश्मनावर भारी पडलं हुतं. बाजी बांदलांचं ते लढाऊ रूप बघून शानं सिद्दी च्या शिबंदीची पाचावर धारणं बसली हुती.
  
आज खर्या आर्थानं खिंड बांदल शेनेनं आपल्या रगातानं पावनं केली होती.

पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏🚩

 श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला


⚔️
पावनखिंड ⛰️🚩
"ही तो श्रींची इच्छा"
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वाक्य,
या अशा असामान्य व्यक्तींच्या धाडसाने खरे ठरते⚔️
एखाद्या क्षणी, मानवी शरीरातील प्रबळ इच्छाशक्ती, इतकी अशक्यप्राय कामगिरी करून जाते की, आपण फक्त नतमस्तक होणे इतकेच घडावे.
बाजीप्रभू देशपांडे हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर एक शेंडीधारी, धिप्पाड शरीरयष्टी असलेला,
"लाखांचा पोशिंदा जगावा" हा ध्यास मनी बाळगून, शेवटच्या क्षणापर्यंत शौर्याचा अग्नी पेटविणारा लढवैय्या,
डोळ्यासमोर उभा राहतो.

⚔️
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते.
बाजीप्रभू हे सुरुवातीला शिवाजी महाराजांविरुद्ध कारवाया करणाऱ्या हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते.
परंतु कालांतराने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.
बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने घोडखिंड लढविली.
पन्हाळगडाला शत्रूंने वेढा घातलेला असताना शिवाजी महाराजांची त्यातून सुटका करणे व महाराजांना विशालगडावर पोहोचवणे हे स्वराज्याचे मोठे कार्य बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देऊन पार पडले .
२१ तास चालून थकलेले शरीर व हाताशी केवळ ३०० मावळे अशा परिस्थितीतही बाजीप्रभूंनी सिद्धीच्या हजारोंच्या सैन्याला घोडखिंडीत मोठ्या हिमतीने रोखले.
सलग ६ ते ७ तास खिंडीत बाजीप्रभू व त्यांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, शत्रू सैन्याला खिंड ओलांडून दिली नाही.

🚩
रणजित देसाई, त्यांच्या कादंबरीच्या नायकाला संपूर्ण न्याय देतात.
तो नायक त्यांच्या लेखणीतून वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत करतात.
या कादंबरीतही आपण जणू, याची देही याची डोळा, तो क्षण,
तो इतिहास, जगत असल्याचा अनुभव मिळतो.
पुन्हा पुन्हा वाचावी, आणि तरीही वाचनाची भूक कमी नं व्हावी अशी कादंबरी.

✍️
येणाऱ्या ७ दिवसात पावनखिंड आणि धगधगता इतिहास🚩⚔️
.
.
.
@history_maharashtra
-----------------------------------------------------
#maharashtra_ig #maharashtra_desha
#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #महाराष्ट्र
#दुर्ग_हीच_खरी_संपत्ती #shivajimaharajstatus #huntforspot #westernghat #chhatrapatishivajimaharaj

https://www.instagram.com/p/CRBw-/?utm_medium=copy_link

   ( संकलित माहिती).
close