पडलो नाही अजुनी, लागल्या कितिक ठेचा..!
चालतो आहे अजुनी, खुंटल्या कितीक वाटा..!!
ध्येय माझ्या ऊरात, आहे जिवंत अजुनी..!
दोर हा पतंगा, आहे जखडुन अजुनी..!!
मातीचा हा सुगंध, आहे स्वासात जपुनी..!
जात ना पुसावी, आहे माणुस अजुनी..!!
मरण यावे स्मरुनी, डोळ्यात हास्य ठेवुनी..!
रात्रीला सुर्य फुलावा, दिस ऊगावा चंद्र बनुनी..!!
एक गाव वसावा, प्रेमाचे घरटे बांधुनी..!
धरतीचा अंबर व्हावा, अंबरात बाग फुलावी..!!
गाव तो बुडावा, पावसाची गाणी गाऊनी..!
करुनेचा सागर व्हावा, बुद्धांची वाणी होऊनी..!!
आकाश सुपारे
9822510254

